घरमुंबईमुंबईकरांनो आज घ्या चांगल्या हवेत 'श्वास'

मुंबईकरांनो आज घ्या चांगल्या हवेत ‘श्वास’

Subscribe

मुंबईकरांनी सोमवारी चांगल्या हवेत श्वास घेतला असून आज, मंगळवारीही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मुंबईकर आज चांगल्या हवेत श्वास घेऊ शकणार आहेत.

सतत प्रदूषणाचा मारा होत असलेल्या मुंबईकरांनी सोमवारी चांगल्या हवेत श्वास घेतला असून आज, मंगळवारीही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘सफर’ या हवेची गुणवत्ता नोंदवणाऱ्या प्रणालीनुसार मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक सोमवारी सायंकाळच्या सुमारास ८८ होता. शहरात सुरु असलेली बांधकामे आणि वाहन प्रदूषण या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यामुळे हा दिलासा मिळाला आहे.

या ठिकाणी हवा होती चांगली आणि समाधानकारक

बोरिवली, चेंबूर, वरळी, माझगाव, कुलाबा येथे सोमवारी हवा चांगली आणि समाधानकारक असल्याचे गुणवत्ता निर्देशांकातून समोर आले आहे. वरळी येथे पीएम १०, पीएम २.५, नायट्रोजनडाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, ओझोन या सगळ्या प्रदूषकांचा निर्देशांक चांगला होता. तसेच चेंबूर येथेही पीएम १०, पीएम २.५ आणि नायट्रोजनडाय ऑक्साइड या तीन प्रदूषकांचा निर्देशांक चांगला होता. तर इतर ठिकाणी पीएम १० आणि पीएम २.५ ही प्रदूषके समाधानकारक टप्प्यात होती. त्याचबरोबर मालाड, अंधेरी आणि वांद्रे-कुर्ला संकुल येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक होता. याचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबईकरांनी सोमवारी चांगल्या हवेमध्ये श्वास घेतला असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

तर हवेचा गुणवत्ता निर्देशांक भांडुप येथे ९०, कुलाबा येथे ६१, मालाड येथे ९७, माझगाव येथे ६३, वरळी येथे ४९, बोरिवली येथे ८०, वांद्रे-कुर्ला संकुल येथे १३३, चेंबूर येथे ५७, अंधेरी येथे १६२ असा होता. तर नवी मुंबईत मात्र हा निर्देशांक मध्यम नोंदला असला तरी तो वाईटच्या जवळ म्हणजे १८९ असा असल्याचा निर्देशांक आहे.

आजचा निर्देशांक

आज, मंगळवारी हा निर्देशांक ९३च्या आसपास राहण्याचा अंदाज सफरने वर्तवला आहे. त्यामुळे उन्हाचा त्रास झाला तरी हवेच्या प्रदूषणाची स्थिती मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

- Advertisement -

वाचा – मुंबईचे वातावरण ढगाळ राहणार; हवामान खात्याचा अंदाज

वाचा – मुंबईत गॅस्ट्रोचे थैमान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -