घरताज्या घडामोडीमराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रपतींना लाखो पत्र पाठवणार

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी राष्ट्रपतींना लाखो पत्र पाठवणार

Subscribe

मराठी भाषेला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा आहे. या विषयीची खात्री पटवून देण्यासाठी अनेक दाखले देणारे दालन आणि लघुपट बघितल्यानंतर इथे आलेल्या प्रत्येक मराठी भाषेचा अभिमान बाळगणा-या व्यक्तीला राष्ट्रपतींना पत्र पाठवता येणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहून इथुनच पाठविण्यासाठी पत्रपेटीची सोय करण्यात आली आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राष्ट्रपतींना पत्र लिहिण्याची संधी मराठीप्रेमींना मिळणार आहे. तशी व्यवस्था अभिजात मराठीची महती सांगणाऱ्या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आली आहे.मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज उद्‍घाटन झाले. मराठी भाषेला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा आहे. या विषयीची खात्री पटवून देण्यासाठी अनेक दाखले देणारे दालन आणि लघुपट बघितल्यानंतर इथे आलेल्या प्रत्येक मराठी भाषेचा अभिमान बाळगणा-या व्यक्तीला राष्ट्रपतींना पत्र पाठवता येणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहून इथुनच पाठविण्यासाठी पत्रपेटीची सोय करण्यात आली आहे.

मराठीच्या जनजागृतीसाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेला ‘शांतता, मराठीचे कोर्ट चालू आहे’, हा लघुपट आजपासून मंत्रालय परिसरात दाखविण्यात येत आहे. याच ठिकाणी अभिजात मराठीची महती सांगणारे प्रदर्शनदेखील भरविण्यात आले आहे. यावेळी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलिंद गवादे, अवर सचिव अजय भोसले, उर्मिला धादवड आदी उपस्थित होते.

- Advertisement -

नुकतेच नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये हा लघुपट दाखविण्यात आला होता. त्यानंतर हिवाळी अधिवेशन काळात सर्व लोकप्रतिनिधींसाठी विधानभवन परिसरात हा लघुपट दाखविण्यात आला. आजपासून मंत्रालय परिसरातील अधिकारी आणि अभ्यागतांना या लघुपट व प्रदर्शनाचा लाभ घेता येईल.


हे ही वाचा – ‘त्या’ गुंडाची फोटोसहित माहिती प्रसिद्ध करा; माधव भांडारींचे पटोलेंना आव्हान

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -