घरक्राइमबाईकचोर टोळक्याच्या मुसक्या आवळल्या, दोघे अल्पवयीन!

बाईकचोर टोळक्याच्या मुसक्या आवळल्या, दोघे अल्पवयीन!

Subscribe

उल्हासनगर मधील एका २४ वर्षीय तरुणावर चाकूने वार करून त्याची मोटारसायकल जबरदस्तीने चोरुन नेणाऱ्या ३ जणांच्या टोळक्याला उल्हासनगर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी तब्बल १० मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे, या टोळीचा मुख्य सूत्रधार लाला उर्फ रियाज मोहम्मद मणियार हा अवघ्या १८ वर्षांचा असून त्याचे दोन साथीदार हे अल्पवयीन आहेत.

३० ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास उल्हासनगर – २ येथील खेमानी परिसरात राहणारा विनयकुमार बाकेलाल यादव ( २४ ) हा त्याची चुलत बहीण कविता हिला औषधोपचारासाठी जवळच्या खाजगी दवाखान्यात घेऊन आला होता. त्याने मोनिका कॉम्प्लेक्स या इमारतीजवळ मोटारसायकल पार्क केली होती. काही वेळाने दवाखान्यातून विनयकुमार आणि त्याची बहीण बाहेर आले व मोटारसायकलकडे जाऊ लागले. तेव्हा विनयकुमारची मोटारसायकल तीन अज्ञात इसम डुप्लिकेट चावीने उघडत असल्याचे त्याने पाहिले. त्याने आरोपींना थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर चाकूने वार करून आरोपी फरार झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा गुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

- Advertisement -

या प्रकरणी फिर्यादी विनयकुमार याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी ३ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता कामगार हॉस्पिटलजवळ एक जण संशयास्पद स्थितीत वावरताना आढळला. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली असता त्याने आपले नाव लाला उर्फ रियाज मोहम्मद मणियार असल्याचे सांगून तो उल्हासनगर – येथील बाल्कजी बारी येथे राहत असल्याचे सांगितले. पुढील तपासात त्याने त्याच्या २ अल्पवयीन साथीदारांसह ३ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ७ एक्टिव्हा स्कूटर, ३ मोटारसायकल वेळवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

यावेळी आरोपींनी विनायकुमारची चोरी केलेली मोटारसायकल उल्हासनगर – २ मधील आझादनगर परिसरात रामभाऊ म्हाळगी चौक जवळ पार्क केल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही मोटारसायकल ताब्यात घेतली आहे. याशिवाय इतर चोरीच्या एक्टिव्हा स्कूटर आणि मोटारसायकल देखील हस्तगत केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -