घरमुंबईमोनोरेलवरही आता डॉग स्क्वॉड

मोनोरेलवरही आता डॉग स्क्वॉड

Subscribe

सुरक्षिततेचा उपाय म्हणून एमएमआरडीएचे पाऊल

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (महालक्ष्म) दरम्यानच्या वाहतूकीसाठी मोनोरेल लॉकडाऊननंतर सज्ज होतेय. पण मोनोरेलच्या सुरक्षेत यंदा भर पडणार आहे ती म्हणजे श्वानपथकाची. मोनोरेलच्या संपुर्ण मार्गादरम्यान सुरक्षिततेचा उपाय म्हणून मोनोरेलने हा पुढाकार घेतला आहे. एकुण दोन वर्षांसाठी श्वान पथकाची नेमणुक करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतल्या वाहतुकीच्या साधनांमध्ये चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या टप्प्यात मोनोरेलचे नेटवर्क आहे. या टप्प्यात मोनोरेलकडून वाहतुकीच्या सुविधेसाठी आगामी कालावधीमध्ये आणखी ट्रेनची संख्या वाढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे अनलॉकमध्ये मोनोरेल येत्या काही दिवसात सुरू झाल्यास मोनोरेलच्या सुरक्षा व्यवस्थेत श्वान पथकाची भर पडणार आहे. मोनोरेलने सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेत स्निफर डॉगची सुरक्षा पुरवणाऱ्या एजन्सीला सहभागी व्हायला सांगितले आहे. त्यामुळे येत्या दिवसात मोनोरेलच्या मार्गावर स्निफर डॉग स्क्वॉड दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.

- Advertisement -

एमएमआरडीएने सुरू केलेली निविदा प्रक्रिया ही सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेली काळजी आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे प्रवक्ता बी जी पवार यांनी दिली. सुरक्षा यंत्रणांकडून डॉग स्क्वॉडची नेमणुक ही साधारणपणे महत्वाच्या स्थानकाच्या ठिकाणी गर्दीत ठेवलेल्या संशयास्पद अशा वस्तूंची पडताळणी करण्यासाठी होत असतो. त्यामुळे मोनोरेलच्या महत्वाच्या स्थानकावर या डॉग स्क्वॉडची नेमणुक होणे अपेक्षित आहे. येत्या काळात मोनोरेलची स्थानके ही मेट्रोशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मोनो आणि मेट्रो अशी प्रवाशांची वाढती संख्या घेऊनच ही सुरक्षा व्यवस्था उभारण्याचा विचार एमएमआरडीएने केला आहे.


 

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -