- Advertisement -
मनसे शाखा अध्यक्षाचे वीज कनेक्शन कापल्याने या पदाधिकार्याने थेट महावितरण कार्यालयावर हल्ला चढविला. महावितरणच्या अधिकार्यांना विचारला असताना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राग अनावर होऊन मनसे नवी मुंबईचे करावे येथील शाखा अध्यक्ष नरेश कुंभार यांनी तोडफोड केली. मनसेकडून विजवितरण विभागाविरोधात आक्रमक पवित्रा सुरूच आहे. मनसेकडून महावितरण कार्यालयाची तोडफोड करण्याची नवी मुंबईतील ही दुसर्यांदा घडलेली घटना आहे.
- Advertisement -