Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई बांधकाम इमारतीचा स्लॅब कोसळला

बांधकाम इमारतीचा स्लॅब कोसळला

खारघर येथील घटना, एकजण गंभीर जखमी

Related Story

- Advertisement -

खारघर सेकटर – २० मधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम बुधवारी अचानक कोसळून एक कामगार जखमी झाला आहे. ढिगार्‍याखाली सात कामगार अडकले होते. तात्काळ पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि कामगारांची सुटका केली. एक कामगार जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिली.

खारघर सेक्टर 20 मधील भूखंड क्रमांक 94 येथे तीन मजली इमारतीचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी तिसर्‍या मजल्याचा स्लॅब बांधला होता. दुपारी सदर स्लॅब भरणीचे काम सुरू होते तेव्हा अचानक स्लॅब कोसळल्याने खाली असलेला कंत्राटदार अरविंद गंभीर जखमी झाला. या अपघातात काही कामगार देखील अडकले. मात्र, अग्निशमन दलाच्या जवांनी त्यांना वेळीच बाहेर काढले.

- Advertisement -