घरमुंबईएड्स रुग्णांसाठी मोबाईल व्हॅन सेवेत दाखल

एड्स रुग्णांसाठी मोबाईल व्हॅन सेवेत दाखल

Subscribe

मुंबई एड्स जिल्हा नियंत्रण सोसायटीकडे आधीपासून ३ बसेस आहेत. पण, या बसेस खूप मोठ्या असल्याकारणाने अरुंद रस्त्यावर, झोपडपट्टी परिसरात जाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे, या मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

एड्स रुग्णांसाठी ‘मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोयायटी’ ने पुढाकार घेत ‘मोबाईल व्हॅन’ ची सेवा सुरू केली आहे. या मोबाईल व्हॅनचं सोमवारी उद्घाटन करण्यात आलं. एड्स रुग्णांच्या राहत्या ठिकाणी जाऊन त्यांची तपासणी करण्यासाठी ‘मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोयायटी’ ने ही मोबाईल व्हॅन सुरू केली आहे. आयओसीएल म्हणजेच ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीच्या सीएसआरमधून ही व्हॅन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मोबाईल व्हॅनमध्येच एड्स रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. ज्यामुळे एड्स रुग्णांचा येण्या-जाण्याचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहे.

मोबाईल व्हॅनची सुविधा सुरु

झोपडपट्टी परिसरात एड्स रुग्णांसाठी जी आरोग्य शिबीरं भरवली जातात. ज्या तपासण्या केल्या जातात त्या मोठ्या बसेस मध्ये केल्या जातात. त्यासाठी मुंबई एड्स जिल्हा नियंत्रण सोसायटीकडे आधीपासून ३ बसेस आहेत. पण, या बसेस खूप मोठ्या असल्याकारणाने अरुंद रस्त्यावर, झोपडपट्टी परिसरात जाण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे, या मोबाईल व्हॅनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला आरोग्य समिती अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव या ही उपस्थित होत्या.

” २०२० पर्यंत एड्स रुग्णांचं प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत कमी करायचं आहे. १०० टक्के होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं गरजेचं आहे. आजही समाजात एड्सविषयी खूप मोठा गैरसमज आहे. त्यामुळे, या मोबाईल व्हॅनचा उपयोग उपचारांसह रुग्णांना उपचारांसाठी माहिती देण्यास होणार आहे.” – डॉ. अर्चना भालेराव, आरोग्य समितीच्या अध्यक्षा

- Advertisement -

व्हॅनमध्ये अत्याधुनिक सुविधा

या व्हॅनमध्ये रुग्णांसाठी ३ कॅबिन्स आहेत. डॉक्टरांची केबिन, लॅब सेट अप आणि एक कॉऊन्सिलरसाठी केबिन आहे. शिवाय, जनजागृतीच्या माध्यमासाठी टिव्ही देखील बसवण्यात आला आहे. जिथे रुग्ण जनजागृतीपर व्हीडिओ, चलचित्रं पाहू शकतात. शिवाय, औषधांचे किट्स ठेवण्यासाठी छोटा फ्रिज देखील उपलब्ध आहे. रुग्णाला बसण्यासाठी खूर्च्या, पाण्याची टाकी, पंखा अशा सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.

” एड्स रुग्णांसाठी या मोबाईल व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलं आहे. ही मोबाईल व्हॅन खूप छोटी आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यांवरुन चालवणं ही सोपं होणार आहे. झोपडपट्टी परिसरातील रुग्णांना शोधण्यासाठी या मोबाईल व्हॅनचा खूप फायदा होणार आहे. एचआयव्ही कार्यक्रमाअंतर्गत पब्लिक सेक्टर युनिटने पहिल्यादांच एड्स रुग्णांसाठी हा पुढाकार घेतला आहे. मुंबईतील जवळपास सर्वच ठिकाणांवर या व्हॅनच्या माध्यमातून पोहोचता येणार आहे. कामाठीपूरा, ग्रँटरोड, गोरेगाव, मालाड मुंबईतील छोट्या -छोट्या झोपडपट्ट्या अशी सर्वच ठिकाणी ही व्हॅन पोहचू शकणार आहे. त्यामुळे छोट्या रस्त्यांमधून जाण्यासाठी ही व्हॅन खरंच फायदेशीर ठरणार आहे. ” – डॉ. श्रीकला आचार्य , प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -