घरमुंबईHanuman Jayanti 2022 : हनुमान जयंतीनिमित्त मंदिरांना 1 हजार लाऊडस्पीकर देण्यास सुरुवात-...

Hanuman Jayanti 2022 : हनुमान जयंतीनिमित्त मंदिरांना 1 हजार लाऊडस्पीकर देण्यास सुरुवात- मोहित कंबोज

Subscribe

3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावली जाईल अशी आक्रमक भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. यावरून राज्यात मशिदींवरील भोंगे विरुद्ध मनसेची हनुमान चालीसा असा वाद सुरु आहे. मनसेच्या या भूमिकेला आता भाजपनेही पाठिंबा दर्शवला आहे.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबईतील एका मंदिरातून मोफत भोंगे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. हनुमान जयंती निमित्त राज्यातील मंदिरांमध्ये 1 हजारहून अधिक भोंगे वाटप केले जाणार असल्याचे कंबोज म्हणाले. यासाठी त्यांनी रितसर अर्जही मागवले आहेत. या अर्जांची पडताळणी करुन ते लाऊटस्पीकर दिले जाणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी मशिदींवरील भोंग्यावर आक्षेप नोंदवला. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर अनेक प्रतिक्रिया येत असताना आता भाजपच्या अनेक नेत्यांनी याला पाठिंबा दर्शवला. या नेत्यांमध्ये मोहित कंबोज आघाडीवर आहे. मोहित कंबोज यांनी यानंतर चक्क मंदिरांना लाऊडस्पीकर देण्याची घोषणा केली. ही घोषणा अखेर त्यांनी पूर्ण केली आहे.

मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हटले की, आजपासून लाऊडस्पीकर देण्यास सुरुवात केली आहे, श्री घंटेश्वर हनुमान मंदिर, ११ वा रस्ता, मधु पार्क, खार (पश्चिम), मुंबईमध्ये पहिला लाऊडस्पीकर देण्यास सुरुवात झाली आहे. बोला सियावर रामचंद्र की जय… 16 एप्रिल हनुमान जयंतीनिमित्त मंदिरांना लाऊट स्पीकर देण्यास सुरुवात झाली आहे. जय श्री राम… जय श्री राम

- Advertisement -

दरम्यान यावर मोहित कंबोज यांनी सरकारला सवाल करत विचारले की, सुप्रीम कोर्टाचा आदेश धुडकावलेल्या भोंग्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का आहेत? शिवसेना गप्प का आहे? सत्तेच्या लाचारीसाठी तुम्ही महाआरतीच्या विरोधात जाणार आहेत का? असे सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केले आहेत.


सेव्हन हिल्स रुग्णालयात होणार आता स्वर यंत्र आणि स्वर नलिकेतील त्रासावर उपचार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -