घरमुंबईचंद्रावरील दीडशहाणे !

चंद्रावरील दीडशहाणे !

Subscribe

जमीन खरेदीच्या नावाने 50 हजारांचा गंडा

पृथ्वीवरील जमिनीचे गैरव्यवहार करून भामट्यांनी अनेकांना गंडा घातल्याच्या घटना आपल्या कानावर येत असतात.परंतु,आता अशा लबाड लोकांची मजल थेट चंद्रावरील जमीन विकण्यापर्यंत गेली आहे.आश्चर्य म्हणजे त्यांच्या या आमिषाला पुण्यातील एक महिली बळी पडली देखील आणि एकरी 50 हजार या भावाने एक एकर जमीन खरेदी केली. परंतु,काही दिवसांनी तिला आपली फसवणूक झाल्याचे समजले.

पुण्यात राहणार्‍या राधिका दाते – वाईकर यांनी १३ वर्षांपूर्वी जागा विकत घेतली. त्यांनी त्यावेळी एक एकर जागेसाठी ५० हजार रुपये मोजले. परंतु, त्याबाबत चौकशी केली असता चंद्रावर जमीन कोणी विकत नसल्याचे समोर आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र त्यांची तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.

- Advertisement -

राधिका यांच्या म्हणण्यानुसार पंजाब येथील एका व्यक्तीने लुनर फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी राधिका यांनी एका वृत्तवाहिनीवर पाहिली. चंद्रावर जागा खरेदी करायची असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा, अशी जाहिरात करण्यात आली होती. राधिका यांनी संबंधित संस्थेशी संपर्क साधला. या संस्थेने त्यांना ६ नोव्हेंबर २००५ रोजी ५० हजार रुपये ऑनलाइन भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे राधिका या महिलेने एक एकर जागा खरेदी करण्यासाठी ऑनलाइन ५० हजार रुपयाची रक्कम भरली. त्यानंतर त्या महिलेने संबंधित संस्थेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या संस्थेचा फोन लागत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -