घरमुंबईउद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केली ५ हजारांची वृक्ष लागवड

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त केली ५ हजारांची वृक्ष लागवड

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह अंतर्गत अंबरनाथ येथे ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह अंतर्गत अंबरनाथ शिवसेना शहर शाखा, वनविभाग, ठाणे व शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या संयुक्त विद्यमाने वन विभागाच्या कृत्रिम नैसर्गिक पुनर्निर्मिती योजने अंतर्गत अंबरनाथ – पश्चिम येथील फॉरेस्ट नाका परिसरातील वन विभागाच्या २५ हेक्टर जमिनीवर सुमारे ५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याप्रसंगी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, उपशहर प्रमुख संभाजी कळमकर, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद ठाकर, नगरसेविका प्रज्ञा बनसोडे, नगरसेवक रवींद्र पाटील, पद्माकर दिघे, विभागप्रमुख मिलिंद गान तसेच संत निरंकारी आध्यात्मिक मंडळ, ब्रह्मकुमारी आध्यात्मिक मंडळ, आणि अंबरनाथ मधील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येकाने एक वृक्ष लावलच पाहिजे

भगव्या सप्ताह अंतर्गत २७ जुलै पर्यंत शिवसेना शहर शाखेच्या वतीने संपूर्ण अंबरनाथ शहरात विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सुरुवात शनिवारी ५ हजार वृक्षांची लागवड करत करण्यात आली आहे. मुसळधार पाऊस असताना देखील अंबरनाथ मधील सामाजिक संघटना, आध्यात्मिक मंडळे आणि विद्यार्थी संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या वृक्षारोपणाला मिळाला याबद्दल आमदार डॉ. किणीकर यांनी त्यांचे आभार मानत निसर्गाचे संतुलन राखण्याकरिता प्रत्येकाने एक वृक्ष लावलच पाहिजे, असे यावेळी आमदार डॉ. किणीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – वृक्ष लागवडीसाठी खालापूर वन विभाग सज्ज

हेही वाचा – १३ कोटी वृक्ष लागवडीचा फज्जा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -