घरमहाराष्ट्रकलानी परिवाराकडून एकच सदस्य निवडणुक लढविणार

कलानी परिवाराकडून एकच सदस्य निवडणुक लढविणार

Subscribe

२०१४ मध्ये ज्योती कलानी यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकी काबिज केली

उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी या देखील भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ज्योती कलानी यांनी कलानी परिवाराकडून एकच सदस्य निवडणूक लढविणार असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

कलानी परिवारात दोन गट

उल्हासनगर विधानसभा ही मागील तीन दशकांपासून कलानी परिवाराची मक्तेदारी होती. मात्र २००९ मध्ये भाजपचे कुमार आयलानी यांनी धक्का देत पप्पू कलानी यांचा पराभव केला. त्यानंतरच्या काळात पप्पू कलानी यांची रवानगी थेट कारागृहात झाली. २०१४ मध्ये ज्योती कलानी यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदारकी काबिज केली. त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका काबीज करून २०१९ मध्ये पुन्हा एकदा विधानसभा जिंकेल असे वाटत असतानाच कलानी परिवारात दोन गट पडले. आई ज्योती कलानीला सोडत मुलगा ओमी कलानी आणि त्याची पत्नी पंचम कलानी हिने भाजपमध्ये प्रवेश केला. याचा फायदा भाजपला होऊन जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी या महापौर झाल्या. भाजपने दिलेला शब्द पाळत महापौर पदी विराजमान असलेल्या भाजपच्या मीना आयलानी याना सव्वा वर्षानंतर राजीनामा द्यायला लावत त्या जागी पंचम कलानी यांना बसविले आहे.

- Advertisement -

ज्योती कलानीच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगात

आता विधानसभा निवडणूक ही अवघ्या तीन महिन्यांवर आली असून भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले कुमार आयलानी हे प्रबळ दावेदार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती कलानी या आमदार आहेत, त्यांनी जर भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश केला तर कलानी परिवाराला भाजपकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ज्योती कलानीच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगात आली होती.

याबाबत भाजपच्या कोर कमिटीतील सदस्यांना विचारले असता महाराष्ट्रातील काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मोठ्या प्रमाणात भाजपच्या वाटेवर आहेत. मात्र ज्या ठिकाणी आम्ही वरचढ आहोत त्या ठिकाणी समोरच्या आमदाराचा प्रवेश भाजप आणि मित्र पक्ष असलेली शिवसेना करून घेत नाही, असे त्या सदस्याने सांगितले. तसेच ही प्रवेश प्रक्रिया शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या संगनमताने करीत असल्याचे भाजप कोर कमिटीच्या सदस्याने सांगितले.

- Advertisement -

आमदार ज्योती कलानी याना अन्य पक्षात प्रवेशाबाबत विचारले असता ”मी राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहणार”. मात्र ज्योती कलानी याना तुम्ही निवडणूक लढविणार का? असे विचारले असता ”कलानी कुटुंबाकडून कोणत्याही एक सदस्य निवडणूक लढवेल.” असे ज्योती कलानी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -