घरमुंबईफुकट रेल्वे प्रवास करणारे सर्वाधिक फुकटे 'मुंबईकर'च!

फुकट रेल्वे प्रवास करणारे सर्वाधिक फुकटे ‘मुंबईकर’च!

Subscribe

३९ हजार ३४३ फुकट्यांवर रेल्वेची कारवाई, १ कोटी ४४ लाख रुपयांचा केला दंड वसूल

सर्वसामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवास सुरु करण्याबाबत एकीकडे राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनात एकमत होत नाही आहेत. तर दुसरीकडे हतबल झालेल्या मुंबईकरांनी लोकल प्रवासासाठी रेल्वेच्या नियमाला आता बायपास देण्याचा सपाटा लावला आहे. मध्य रेल्वे मार्गांवर ऑक्टोबर महिन्यात २४ हजार फुकट्यांनी प्रवास केल्या आहे तर लांबपल्याच्या रेल्वे गाड्यात १५ हजार ३४३ फुकट्यांनी प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे एकट्या उपनगरीय लोकल सेवेतून २० हजार फुकट्या प्रवाशांनी प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेने फुकट्या प्रवाशांवर कारवाईकरत तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांच्या दंड वसूल केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यापासून सर्वसामान्य मुंबईकरांची उपनगरीय लोकल सेवा बंद आहेत. फक्त महिला प्रवाशाबरोबर १७ प्रर्वगातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. राज्य सरकारने मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. परंतु लोकलच्या गर्दीवर ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत रेल्वेने सरसकट मुंबईकरांना लोकल प्रवास नाकारला आहे. त्यामुळे मुंबईकरांना लोकलची दारे कधी उघडणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यांच्या फटका मुंबईकरांना बसला आहे.

- Advertisement -

रस्त्यांवरची गर्दी वाढली असून बेस्ट आणि एसटी बसेसवर मोठ्या प्रमाणात ताण वाढला आहे. राज्य सरकार आणि रेल्वेच्या भांडणाला वैतागून लोकल प्रवाशांनी रेल्वे नियमाला आता बायपास करताना दिसत आहे. ऑक्टोंबर महिन्यात मध्य रेल्वेवर ३५ हजार ३४३ फुकट्यांनी प्रवास केला आहे. ज्यामध्ये मुंबई उपनगरील लोकलमधून २० हजार तर इतर विभागात १५ हजार ३४७ फुकट्या प्रवाशांच्या समावेश आहे.तसेच उपनगरील लोकल सेवेत बनावट ओळखपत्रावर प्रवास करणार्‍या २०० प्रवाशांना पकडण्यात आले आहेत.

मुंबई विभागात सर्वाधिक फुकटे प्रवासी

मुंबई विभागात ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक फुकट्या प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबई विभागात एकट्या उपनगरीय लोकल ट्रेनमधून २० हजार तर लांबपल्याचा गाड्यात ४ हजार अशा एकूण २४ हजार फुकट्या प्रवाशांवर रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल ९२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर मध्य रेल्वेच्या इरत विभागात १५ हजार ३४३ फुकट्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५२ लाख रुपयांच्या दंड वसूल केला आहे.

- Advertisement -

रेल्वेची वाढली डोके दुखी

उपनगरील लोकल सेवेत अद्यापही पुरुष प्रवाशांना प्रवासात मुभा देण्यात आली नाही आहे.त्यामुळे उपनगरीय लोकल सेवेत फुकट्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रेल्वेची डोके दुखी वाढत जात आहे. तसेच उपनगरील लोकल सेवा सर्वसामान्यासाठी सुरु करण्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन सुध्दा प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर पुरुष प्रवाशांसाठी लवकरात लवकर उपनगरीय लोकल सेवा सुरु झाली नाहीत येत्या काही दिवसांता मोठ्या प्रमाणात फुकट्या प्रवाशांची संख्या वाढणार आहे.


मुंबईत कोरोनाची दुसरी लाट दिवाळीनंतर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -