घरताज्या घडामोडीमुंबईत कोरोनामुळे सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू, मध्यम वयातील मृतांची संख्या अडीच हजारांवर

मुंबईत कोरोनामुळे सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू, मध्यम वयातील मृतांची संख्या अडीच हजारांवर

Subscribe

मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेने कोरोनापासून अधिक काळजी घेण्याची व कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना केले आहे.

मुंबईत कोरोनाच्या तीन लाटांमध्ये मृत पावलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक मृत्यू हा ६० ते ९० पेक्षाही अधिक वयाच्या १२,८३३ ज्येष्ठ नागरिकांचा झाला आहे. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे २० ते ४९ वयोगटातील तरुण, मध्यम वयाच्या २,६६८ रुग्णांचाही मृत्यू झाला आहे.

मुंबईत सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. त्यातच वैद्यकीय तज्ज्ञांनी तर कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. मात्र कोरोनाच्या तीन लाटा यशस्वी उपचारांमुळे परतावून लावणारी पालिका आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या चौथ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहे.

- Advertisement -

मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला. त्यानंतर कोरोनाची पहिली , दुसरी व तिसरी लाट आली. त्यामुळे शासन व प्रशासन यांना कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनचे पाऊल उचलावे लागले होते. मात्र कोरोनावर प्रारंभी कोणतेच उपचार, लस वगैरे उपलब्ध नव्हते. त्यावेळी पालिका आरोग्य यंत्रणेने सर्व आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करून हजारो कोरोना बाधितांचा जीव वाचविला.

मात्र आतापर्यंत ज्या कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला त्यामध्ये कॅन्सर, टीबी, ह्रदयरोग आदी सहव्याधी असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे ९० पेक्षाही जास्त वयाच्या ३७० रुग्णांचा, ८० ते ८९ वयाच्या २,४४४ रुग्णांचा, ७० ते ७९ वयाच्या ४,७५३ रुग्णांचा आणि ६० ते ६९ वयाच्या ५,२६६ रुग्णांचा समावेश आहे. मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेने कोरोनापासून अधिक काळजी घेण्याची व कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना केले आहे.

- Advertisement -

वयोगट कोरोना बाधित मृत

० – ९ २१,६७९ २९
१० – १९ ५७,०२९ ६५
२० – २९ १,७६,५१९ २३७
३० – ३९ २,१६,१७९ ६७१
४० – ४९ १,८३,१७५ १,७६०
५० – ५९ १,७०,६७६ ३,९३८
६० – ६९ १,२४,३१९ ५,२६६
७० – ७९ ७१,२९६ ४,७५३
८० – ८९ २५,९५७ २,४४४
९० + ४,१०९ ३७०
———————————————————
एकूण १०,५०,९३८ १९,५३३


हेही वाचा : शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा होणार, विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -