घरक्राइममुंबईतील वरुण इंडस्ट्रीजकडून दोन बँकांची 388 कोटींना फसवणूक, CBIने केला गुन्हा दाखल

मुंबईतील वरुण इंडस्ट्रीजकडून दोन बँकांची 388 कोटींना फसवणूक, CBIने केला गुन्हा दाखल

Subscribe

वरुण इंजस्ट्रीज या मुंबईतील कंपनीने दोन बँकांची करोडे रुपयांना फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी वरुण इंडस्ट्रीजच्या दोन्ही संचालकांवर सीबीआयकडून गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई : वरुण इंजस्ट्रीज या मुंबईतील कंपनीने दोन बँकांची करोडे रुपयांना फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी वरुण इंडस्ट्रीजच्या दोन्ही संचालकांवर सीबीआयकडून गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वरुण इंडस्ट्रीजने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांची तब्बल 388.17 कोटी रुपयांना फसवणूकर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता वरुण इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कंपनीचे दोन संचालक किरण मेहता आणि कैलाश अग्रवाल यांच्यासोबतच दोन अज्ञात लोकांवर देखील गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. (Mumbai-based Varun Industries defrauded two banks to tune of 388 crores, CBI registered a case)

हेही वाचा – ईडी प्रमुख संजयकुमार मिश्रा यांच्यासाठी वेगळ्या पदाची निर्मिती? महिन्याभरात नियुक्तीची शक्यता

- Advertisement -

सीबीआयने आज या प्रकरणी कारवाई केली आहे. कंपनीकडून करण्यात आलेल्या फसवणुकीच्या पहिल्या प्रकरणात 269 कोटी रुपयांची तर दुसऱ्या प्रकरणात 118 कोटींची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले आहे. एका वृत्तसमुहाने दिलेल्या माहितीनुसार, याच वर्षी एप्रिल महिन्यात वरुण इंडस्ट्रीजच्या दोन कंपन्यांची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये वरुण ज्वेल आणि ट्रायमॅक्स डेटा सेंटर या दोन कंपन्यांचा समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यावेळी वरुण ज्वेलने PNB या बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःच्या खात्यात 46 कोटी ट्रान्सफर केले होते, असा आरोप करण्यात आला आहे. वरुण ज्वेलने हा व्यवहार केल्यानंतर त्यांचे खाते एनपीए झाले होते.

सीबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वरुण इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या फर्मवर सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लाईव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, वरुण इंडस्ट्रीजवर या बँकांची 388.17 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता वरुण इंडस्ट्रीजच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या कंपनीने बॅंकेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर सीबीआयने या कंपनीच्या दोन्ही संचालकांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

या फसवणुकीच्या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, वरुण इंडस्ट्रीजची एक कंपनी असलेल्या वरुण ज्वेलने पीएनबी बँकेकडून कर्ज घेतल्याने या पीएनबीला तब्बल 63 कोटींचे नुकसान झाले आहे. तर या कंपनीने कर्ज घेऊन त्यातील 8 कोटी रुपये हे मॉरिशसमधील सहाय्यत कंपनीला हस्तांतरित केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. तर वरुण इंडस्ट्रीजची दुसरी कंपनी असलेल्या ट्रायमॅक्स डेटासेंटरने 2014 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राकडून 29 कोटी रुपयांचा कर्ज घेतले होते आणि या कर्जातूनच अनेकांना पैसे हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तब्बल 190 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून त्याचा गैरवापर केल्याचा आरोप देखील ट्रायमॅक्सवर करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -