घरमुंबईपालिकेच्या आरोग्य सेविकांचा विविध मागण्यांसाठी संप

पालिकेच्या आरोग्य सेविकांचा विविध मागण्यांसाठी संप

Subscribe

मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन त्यांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आणि पसरणाऱ्या साथीच्या आजारांबाबत माहिती देणाऱ्या मुंबई पालिकेच्या आरोग्य सेविकांनी संप पुकारला आहे.

मुंबईकरांच्या घरोघरी जाऊन त्यांना आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आणि पसरणाऱ्या साथीच्या आजारांबाबत माहिती देणाऱ्या मुंबई पालिकेच्या आरोग्य सेविकांनी संप पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील २०८ आरोग्य केंद्रं बंद ठेवण्यात आले आहेत. आरोग्य सेविकांना भविष्य निर्वाह निधी आणि निवृत्ती वेतन न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्याची आतापर्यंत अंमलबजावणी केली गेलेली नाही. याच निषेधार्थ मुंबईतील ४ हजार आरोग्य सेविका आज आझाद मैदानावर धडकल्या आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून या महिला आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत. शिवाय, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत या मागण्यांसाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचं या आरोग्य सेविकांनी सांगितले. तसेच, जर या मोर्चाची पालिकेकडून दखल घेतली गेली नाही, तर १३ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे.

आरोग्य सेविकांच्या अनेक मागण्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. वारंवार आंदोलने करून, संप पुकारूनही पालिका प्रशासन कुठल्याही प्रकारच्या हालचाली करत नाही. त्यामुळे, आज आझाद मैदानात आरोग्य सेविका जमल्या आहेत. पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना आम्ही लेखी निवेदन देणार आहोत.
– अॅड. प्रकाश देवदास, अध्यक्ष, आरोग्य सेवा कर्मचारी संघटना

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनात वाढ करावी, या मागणीसाठी आरोग्य सेविकांनी अनेकदा आंदोलनं, संप, उपोषण केले. तरीही, त्यांच्याकडे सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याकारणाने पुन्हा एकदा आरोग्य सेविकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. मुंबई पालिकेच्या आरोग्य केंद्रात एकूण चार हजार आरोग्य सेविका कार्यरत आहेत. दरमहा किमान १५ हजार रुपये मानधन लागू करण्यात आलं तरीही सेविकांना हे वाढीव मानधन दिलं जात नाही. तसेच, मानधनासह इतर मागण्याही प्रलंबित असल्याकारणाने आरोग्यसेविका संपावर गेल्या आहेत.

मुंबई हायकोर्टाने जानेवारी २०१७ रोजी आरोग्य सेविकांना कायमस्वरूपी पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर अजून यावर चर्चा सुरू आहे. याव्यतिरिक्त सेविकांच्या अनेक मागण्या आहेत. सरकारने आमच्या फक्त ७ मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण, अद्याप एकही मागणी मान्य झालेली नाही. यासंदर्भात पालिका आयुक्तांशी चर्चा करणार आहोत.
– वेदिका समजीसकर, आरोग्य सेविका

- Advertisement -

ऑगस्ट २०१८ मध्ये मुंबईतील आरोग्य सेविकांनी एकत्रित येत संप पुकारला होता. या संप काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. पण, अद्याप या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सरकारचे लक्ष पुन्हा एकदा वेधण्यासाठी पालिकेच्या आरोग्य सेविकांनी संप पुकारत मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढला आहे.

मुंबईतील आरोग्य सेविकांच्या मागण्या 

  • पालिका सेवेत समाविष्ट करून घ्या
  • पालिका कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सेवाशर्थी लागू कराव्यात
  • किमान वेतनाचा लाभ द्यावा
  • निवृत्त सेविकांना तीन हजार रुपये पेन्शन द्यावी
  • किमान वेतन १२ हजार रुपये करा
  • प्रोव्हिडंट फंड लागू करा
  • महिलांना भरपगारी प्रसूती रजा द्या

हेही वाचा –

‘काँग्रेस आता फडणवीस सरकारच्या बनवाबनवीचा पर्दाफाश करणार’

काश्मीरचा प्रश्न आम्ही द्विपक्षीय चर्चेतून सोडवू; मोदींचे ट्रम्प यांना सडेतोड उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -