Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक इगतपुरी येथील कळसुबाई शिखरावर मराठी नववर्षाचे स्वागत

इगतपुरी येथील कळसुबाई शिखरावर मराठी नववर्षाचे स्वागत

Subscribe

प्रथम दिवशीच्या पहाटेच कळसुबाई शिखरावर जावून गुढी उभारली

इगतपुरी : राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाईच्या शिखरावर नवीन वर्षाची गुढी उभारुन मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी हा अनोखा उपक्रम राबविला. त्यांनी नववर्षाच्या प्रथम दिवशीच्या पहाटेच कळसुबाई शिखरावर जावून गुढी उभारली. याचवेळी उगवत्या सूर्याचे शिखरावरच दर्शन घेऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या अनोख्या उपक्रमाचे तालुक्यात स्वागत होत आहे. २५ वर्षांपासून हा उपक्रम अखंडित सुरू असून कळसुबाई मित्रमंडळ यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. इगतपुरी तालुका अन कळसूबाईचे शिखर हे एक अतूट नाते निर्माण झाले आहे. जीवनात एक तरी वेळेस महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर जावे ही प्रत्येकाची मनोकामना असते.

- Advertisement -

याला घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोहक अपवाद असून ते नवरात्रात तर दररोज उपाशीपोटी कळसुबाईच्या शिखरावर जातात. वर्षभरातही अनेक उपक्रमांच्या माध्यमातून हे युवक नेहमीच शिखरावर जाउन खर्‍या निसर्गाचा आनंद घेतात. यावेळी निसर्गाच्या सान्निध्यात सर्वात उंच गुढी उभारण्याचे भाग्य लाभले असे मत अध्यक्ष भगीरथ मराडे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -