घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईत २४ तासात १ हजार ३५० नवे रुग्ण,५७ जणांचा...

Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासात १ हजार ३५० नवे रुग्ण,५७ जणांचा मृत्यू

Subscribe

आज मुंबईत ४ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत काल तीन अंकी रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा रुग्णसंख्या इतकी कमी नोंदवण्यात आली. मात्र आज पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईत आज १ हजार ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल हिच संख्या ९५३ इतकी होती. त्याचप्रमाणे मृत्यूसंख्येतही आज वाढ झाली आहे. काल ४४ जणांचा मृत्यू झाला होता तर आज मुंबईत ५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील संख्या अशाप्रकारे वाढत राहिली तर कोरोनामुक्त होणारी मुंबईत पुन्हा कोरोनाबाधित होत जाईल. त्यामुळे सर्वांना आणखी काळजी घेणे महत्त्वाचे आहे.


मुंबईत नेहमीप्रमाणे बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज मुंबईत ४ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६ लाख ४६ हजार १६३ इतकी झाली आहे. आज मुंबईत २२ हजार ७८८ कोरोना चाचाण्या करण्यात आल्या त्यातील १ हजार ३५० चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९३ टक्के इतका आहे. १२ मे ते १८ मे दरम्यान मुंबईचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.२५ इतका झाला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील सध्या ७८ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर सीलबंद इमारतींचे प्रमाणही कमी झाले आहे. मुंबईत सध्या २८४ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

लसीकरणासंबंधी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या लस दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना किंवा अपंग व्यक्तींना लस घेण्यासाठी घराबाहेर पडण्यात धोका निर्माण होऊ शकतो. बऱ्याचदा कोविड सेंटरवर असलेल्या गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे त्यांना घरच्या घरी लस देण्यात यावी अशी जनहित याचिका हायकोर्टात दाखल केली होती. त्या याचिकेला हायकोर्टाने हिरवा कंदील दिला आहे.


हेही वाचा – Corona in India: देशात बाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ; दिवसभरात २,६७,३३४ नवे रूग्ण, ४,५२९ विक्रमी बळींची नोंद

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -