घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! २४ तासांत २,४३८ रुग्ण कोरोनामुक्त, तर १,५४४...

Mumbai Corona Update: मुंबईकरांना दिलासा! २४ तासांत २,४३८ रुग्ण कोरोनामुक्त, तर १,५४४ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत कोरोना व्हायरस आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला कोरोना मृतांची संख्या स्थिर आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ५४४ नवे कोरोनाबाधित आढळले असून ६० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार ४३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ८८ हजार ६९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १४ हजार २६० जणांचा मृत्यू झाला असून ६ लाख ३६ हजार ७५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३५ हजार ७०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत आज दिवसभरात २२ हजार ४३० कोरोनाच्या चाचण्या झाल्या असून आतापर्यंत ५८ लाख ९८ हजार ५०६ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान आज नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी ३५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ३३ रुग्ण पुरुष आणि २७ रुग्ण महिलया होत्या. ३ रुग्णांचे वय ४० वर्षा खाली होते. तर ३८ रुग्णांचे वय ६० वर्षावर होते आणि उर्वरित १९ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते.

- Advertisement -

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के इतका आहे. ९ मे ते १५ मे २०२१ पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.२९ टक्के असून मुंबईतील दुप्पटीचा दर २३१ दिवस झाला आहे. तसेच मुंबईत सक्रिय कंटेनमेंट झोन ८६ आहे. तर सक्रिय सीलबंद इमारती ३३९ इतक्या आहेत. दरम्यान उद्या तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लसीकरण बंद असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व नव्या स्ट्रेनवर Covaxin असरदार – ऑक्सफर्ड जर्नल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -