घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईची रुग्णसंख्या ५ हजारांच्या पार, दिवसभरात ५ हजार ५०४...

Mumbai Corona Update: मुंबईची रुग्णसंख्या ५ हजारांच्या पार, दिवसभरात ५ हजार ५०४ रुग्णांची नोंद

Subscribe

मुंबईत आज एकूण ४६ हजार ८६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईत आज कोरोनाचे ५ हजार ५०४ नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे मुंबईतील कोरोनाची परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. मुंबईत आज १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज एकूण २ हजार २८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या मुंबईत ३३ हजार ९६१ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत आज एकूण ४६ हजार ८६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत आतापर्यंत ३ लाख ८० हजार ११५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आतापर्यंत मुंबईत ३८ लाख ४१ हजार ३६९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत मुंबईत ३ लाख ३३ हजार ६०३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत आतापर्यंत ११ हजार ६२० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचे दर हा ८८ टक्के इतका आहे. तर १८ मार्च ते २४ मार्च पर्यंत मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर हा ०.८९ टक्के इतका आहे. मुंबईत सध्या ४० सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर ४५७ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

होळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र यावर्षीही कोरोनामुळे होळी साजरी करता येणार नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे यंदा होळी आणि रंगपंचमी त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी होळी साजरी करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. पालिकेने दिलेल्या नियमांचे उल्लंधन केल्यास नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज ३५ हजार ९५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: कोरोनाचा उद्रेक! मागील २४ तासात नव्या रुग्णांची संख्या ३५ हजार पार
Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -