घरमुंबईसचिन वाझेला घेऊन NIA चे पथक मुंब्रा खाडी, गायमुख चौपाटीवर

सचिन वाझेला घेऊन NIA चे पथक मुंब्रा खाडी, गायमुख चौपाटीवर

Subscribe

त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझेला काही प्रश्न विचारले, पण वाझेने उत्तर देण्यास टाकले असल्याचे समजते.

मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेल्या सचिन वाझेला घेऊन गुरुवारी रात्री एनआयएचे पथक ठाणे, मुंब्रा आणि गायमुख चौपाटी येथे दाखल झाले होते. मनसुख हिरेन यांना खाडीत कुठे टाकण्यात आले होते याबाबत वाझेकडे त्यांनी चौकशी केली. मात्र, वाझेने याबाबत एनआयए पथकाला कुठलाही प्रतिसाद दिला नाही असे समजते. मुकेश अंबानी स्फोटके प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला आज एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने वाझेला ३ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी सायंकाळी एनआयएचे एक पथक सचिन वाझे याला घेऊन थेट न्यायालयातून ठाण्याच्या दिशेने रवाना झाले होते. वाझेला घेऊन एनआयए पथक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मिळून आला, त्या ठिकाणी मुंब्रा रेतीबंदर खाडी आणि तेथून ४०० मीटर अंतरावर घेऊन गेली. त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझेला काही प्रश्न विचारले, पण वाझेने उत्तर देण्यास टाकले असल्याचे समजते. त्यानंतर हे पथक वाझेला घेऊन घोडबंदर रोडच्या दिशेने रवाना झाले. घोडबंदर रोड येथील गायमुख चौपाटी या ठिकाणी ते दाखल झाले होते.

- Advertisement -

या ठिकाणीच विनायक शिंदे या आरोपीने मनसुख हिरेन यांना ४ मार्चला भेटायला बोलावले होते. एनआयएचे पथक गायमुख चौपाटी या ठिकाणी दाखल झाल्यावर मनसुख हिरेन यांची कुठे भेट घेतली होती याबाबत वाझेकडे चौकशी करण्यात आली. तेथून एनआयएचे पथक मुंबईकडे रवाना झाले. मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एनआयएच्या हाती येताच या प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -