घरCORONA UPDATEMumbai Corona Update: मुंबईच्या रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट ९३ टक्क्यावर

Mumbai Corona Update: मुंबईच्या रुग्णसंख्येत घट, रिकव्हरी रेट ९३ टक्क्यावर

Subscribe

आज मुंबईत २ हजार ५८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबईतील कोरोना (Mumbai Corona Update) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. आजही मुंबईच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईत आज १७ हजार ६४० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यातील १ हजार २४० जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे आज मुंबईत केवळ १ हजार २४० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही आज वाढ झाली आहे. आज मुंबईत २ हजार ५८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६ लाख ३९ हजार ३४० इतकी झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कमी होत चाललेली रुग्णसंख्या पाहता मुंबईकरांना मोठा दिला मिळाला आहे. (Corona patient decline in Mumbai, recovery rate at 93%)


मुंबई आता रिकव्हरी होण्याच्या मार्गावार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईचा रिकव्हरी रेट हा ९३ टक्के झाला आहे. दोन आठवड्यांनंतर मुंबईच्या रिकव्हरी रेटमध्ये बदल झाला आहे. मुंबईत रिकव्हरी रेट वाढला असला तरी मुंबईत मृतांची संख्या स्थिर आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईत मृतांची संख्या कमी आहे. आज मुंबईत ४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत १० मे ते १६ मे पर्यंतचा विचार केला असता मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्के इतका आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईतील सक्रिय कंटेनमेंट झोनही कमी होत आहेत. मुंबईत सध्या ७७ सक्रिय कंटेनमेंट झोन आहेत. तर ३११ सकिय सीलबंद इमारती आहेत.

- Advertisement -

तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईच्या लसीकरणावर परिणाम

मुंबईत आज तौक्ते चक्रीवादळाने थैमान घातले होते. या तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईच्या लसीकरणावर परिणाम झाल्याचे दिसून आले. तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईतील अनेक लसीकरण केंद्र आज बंद ठेवण्यात आली होती. बीकेसी कोविड सेंटरला चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले. परंतु पालिकेच्या प्रसंगावधानामुळे कोविड सेंटरमधील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मुंबईत सकाळीपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार वारे वाहत असल्यामुळे बीकेसी केविड सेंटरचा काही भागल देखिल उखडला गेला.


हेही वाचा – बीकेसी कोविड सेंटरला तौत्के वादळाचा तडाखा, पालिकेने रातोरात रुग्णांना हलवल्याने अनर्थ टळला

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -