घरताज्या घडामोडीSunetra Pawar : बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवारांवर शून्य रुपये कर्ज; उत्पन्न...

Sunetra Pawar : बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवारांवर शून्य रुपये कर्ज; उत्पन्न पतीपेक्षा कोट्यवधीने जास्त

Subscribe

पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या सर्वच नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

कर्ज शून्य, उत्पन्न कोट्यवधींमध्ये 

सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर कोणतेही कर्ज नाही. त्यांनी कोणत्याही बँकेकडून, वित्त संस्थेकडून कर्ज घेतलेले नाही. मात्र व्यवसाय आणि शेतीच्या माध्यमातून त्यांना 2022 – 2023 आर्थिक वर्षात 4 कोटी 22 लाख 21,010 रुपये उत्पन्न झाले आहे. सुनेत्रा पवार यांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या आर्थिक वर्षातील उत्पन्न 80 लाख 76,200 रुपये असल्याचे शपथपत्रात नमुद करण्यात आले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार याचे उत्तपन्न हे पतीपेक्षा जास्त असल्याचे त्यांच्या शपथपत्रावरुन दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Lok Sabha 2024 : …हा तर निव्वळ अंदाज, तुम्ही निकाल बघा…अजित पवार कशाबद्दल म्हणाले असं?

सुनेत्रा पवार यांच्यावर कोणताही खटला दाखल नाही, किंवा कोणतीही कोर्टकेस त्यांच्याविरोधात सुरु नसल्याचेही शपथपत्रात सांगण्यात आले आहे. मात्र अजित पवार यांच्यावर
अंमलबजावणी संचालनालयकडून (ईडी) गुन्हा दाखल असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून नियमबाह्य कर्ज वाटपासंबंधी अजित पवारांवर गुन्हा दाखल असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

उत्पनात सुनेत्रा पवार पतीपेक्षा उजव्या

सुनेत्रा पवारांकडे जंगम मालमत्ता 12,56,58,983 रुपयांची आहे तर अजित पवारांकडे 13,25,06,033 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर, स्थावर मालमत्तेचा त्यांचा तपशीलही समोर आला आहे, त्यानुसार 58,39,40,751 रुपयांची स्थावर मालमत्ता सुनेत्रा पवारांकडे आहे. तर अजित पवार 37,15,70,029 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. उत्पना प्रमाणेच मालमत्तेतही सुनेत्रा पवार या अजित पवारांपेक्षा उजव्या आहेत.

हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई…, फडणवीसांचे सुनेत्रा पवारांबद्दल वक्तव्य

सुनेत्रा पवार यांचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत येणाऱ्या एस.बी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज येथून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात त्यांची नणंद सुप्रिया सुळे या मैदानात आहेत. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited by – Unmesh Khandale 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -