नवरात्री उत्सवासाठी कडेकोट बंदोबस्तात श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज, CCTVची असणार नजर

mumbai mahalakshmi temple reopens for 7th october read guidelines
नवरात्री उत्सवासाठी कडेकोट बंदोबस्तात श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज, CCTVची असणार नजर

घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच ०७ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात येणार आहेत. कोरोना मुळे मंदिरे मोठ्या कालावधी करिता बंद होती. मात्र सर्व मंदिर गुरुवारपासून सुरू होणार आहेत. देश, विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये शासनाने नेमून दिलेल्या अटीनुसार दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे. प्रत्येक भाविकांला मास्क लावणे जरुरीचे असून सोशल डिस्टन्सिंग, सानिटाईझर आणि थर्मल चेकिंग या नियमांचे पालन गरजेच आहे.

तसेच महालक्ष्मी मंदिराने आपली वेबसाईट तयार केली असून (www.mahalakshmitemplemumbai) या वेबसाईटवर बुकिंगचा फॉर्म उपलब्ध होईल. त्या मध्ये दर्शनाचा दिवस, वेळ बुकींग झालेल्यांना मिळेल. या वर्षी श्रीचे मुखदर्शन घेता येईल. त्यासाठी ऑनलाईन बुकींग आवश्यक आहे. ६५ वर्षांवरील स्त्रिया आणि पुरुष, गर्भवती स्त्रिया आणि १० वर्षाखालील प्रवेश दिला जाणार नाही.

महालक्ष्मी मंदिर सकाळी ६ वाजता उघडेल आणि रात्री ९ वाजता बंद केले जाईल. भक्तांनी आणलेली फुले, थाळी, पेढे प्रत्यक्ष हातात घेतली जाणार नाही तसेच प्रसाद ही दिला जाणार नाही. दोन भाविकांमध्ये सहा फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. मंदिराच्या बाहेर जाण्याच्या मार्गावरून कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक भक्ताला मंदिराच्या सुरक्षा यंत्रणेतून जावे लागेल. भक्तांनी या नियमांचे पालन करावे अशी विनंती मंदिर व्यावस्थापन व महा व्यवस्थापक शरद चंद्र पाध्ये यांनी केली आहे .

भाविकांसाठी सूचना 

१. पादत्राणे घालून प्रवेश दिला जाणार नाही.
२. भक्तांच्याा पादत्राणे यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
३. मंदिर परिसरातील कोणतीही मूर्ती , पुस्तके वगैरे ना हात लावण्यास बंदी आहे.
४. भाविकांनी दर्शनासाठी येताना सोबत ई- दर्शन पास किंवा मेसेज द्वारे प्राप्त झालेला संदेश सोबत असणे आवश्यक आहे.
५. महालक्ष्मी देवळातील धार्मिक विधी, पूजाअर्चा मुख्य गुरुजी प्रकाश साधले, सुयोग कुलकर्णी , अरुण वीरकर , चेतन सोहनी , सुरेश जोशी , गिरीश मुंडले , महेश कादरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
६. मंदिर परिसरात आणि हाजीअली परिसर पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांनी आपल्या बरोबर मोठ्या बॅग आणू नयेत असे भालचंद्र वालावलकर आणि गामदेवी पोलिस स्टेशन तर्फे कळविले आहे.
७. दर्शनासाठी वेबसाईट बुधवार दिनांक ६ ऑक्टोबरपासून सकाळी १० वाजल्यापासून खुली राहणार आहे.
८. जर वेबसाईट ओपन झाली नाही तर कृपया ०२२२३५३८९०१ / ०२ या दूरध्वनी वर संपर्क साधून आपला मोबाईल क्रमांक कळवावा आणि दर्शनाची वेळ आणि तारीख निश्चित करावी.