घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी अल्पवयीन मुलीची केली सुटका; पुन्हा पालकांशी घडवली भेट

मध्य रेल्वेच्या कर्मचार्‍यांनी अल्पवयीन मुलीची केली सुटका; पुन्हा पालकांशी घडवली भेट

Subscribe

मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस प्लॅटफॉर्मवर (पळून आलेल्या) एका मुलीची सुटका करून त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट दिली. मंगळवारी ८ फेब्रुवारीला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिकीट तपासणी दरम्यान विशेष पथकाचे मुख्य तिकीट निरीक्षक अतुल दातार यांना विनातिकीट अल्पवयीन मुलगी आढळून आली. तिच्याशी संवाद साधल्यानंतर ती अहमदाबाद येथून घरातून पळून आली असल्याचे उघड झाले.

तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली आणि तिच्या पालकांशी त्वरित संपर्क साधला आणि वाणिज्यिक नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नंतर तिला मुंबई विभागाच्या मेन लाइन स्पेशल स्क्वाडचे मुख्य तिकीट निरीक्षक अभय कांबळे यांच्या उपस्थितीत शासकीय रेल्वे पोलिस (GRP), लोकमान्य टिळक टर्मिनस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

- Advertisement -

तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी केलेले हे काम अतिशय कौतुकास्पद असून मुलीच्या पालकांनी मध्य रेल्वेचे खूप खूप आभार मानले.


हेही वाचा – Hijab Row: हिजाब प्रकरणावर आदित्य ठाकरेंची आली प्रतिक्रिया, म्हणाले…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -