घरमुंबईजेट एअरवेजची प्रवाशांना विशेष ऑफर, फ्लाईट बदलता येणार!

जेट एअरवेजची प्रवाशांना विशेष ऑफर, फ्लाईट बदलता येणार!

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यासोबतच मुंबईतील सर्व प्रकारची वाहतूकदेखील कोलमडली आहे. पावसाचा परिणाम केवळ रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीवर न होता विमान वाहतुकीवरदेखील झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. अशातच जेट एअरवेज कंपनीने प्रवाशांसाठी विशेष ऑफर दिली आहे.

आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने मुंबईत जोर धरला आहे. कालपासून तर मुंबईत धो-धो पाऊस पडतोय. आज दिवसभरात मुंबईत १८२.३७ मिलीमीटर पाऊसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ठप्प झाली. त्यासोबतच मुंबईची रस्ते वाहतूक व्यवस्थादेखील विस्कळीत झाली. मुंबईत सतत होणार्‍या मुसळधार पावसामुळे लोकलसेवा, रस्ते वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झालंच, परंतु पावसाचा विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता आता जेट एअरवेज कंपनीने खास सूट जाहीर केली आहे. जेट एअरवेजने प्रवाशांसाठी खास वेवर ऑफर दिली आहे. त्याबाबत जेट एअरवेजने ट्विटरच्या माध्यामातून ही माहिती दिली आहे. या माहितीनुसार, ९ जुलै रोजी मुंबईला प्रवास करणारे प्रवासी फ्लाईट बदलू शकतात. फ्लाईट बदलण्यासाठी त्यांना कोणतीही पेनल्टी लावली जाणार नाही. जेट एरवेजच्या या ऑफरमुळे प्रवासी सुखावले आहेत.


प्रवाशांच्या सोयीनुसार विमान बदलता येणार

प्रवासादरम्यान कोणताही अडथळा आला तरी प्रवाशांना विमान बदलता येणार आहे. विमान बदलताना दोन विमानांच्या दरांमध्ये फरक असला, तरीदेखील विमान बदलण्याची अनुमती देण्यात आली आहे. एरवी विमान बदलताना अधिक पैसे आकारले जातात. परंतु आजच्या मुंबईतल्या परिस्थितीमुळे प्रवाशांकडून अधिक पैसे आकारले जाणार नाहीत. प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार दुसरे तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. केवळ वेळेमध्येच नव्हे तर तारखेमध्येही बदल करून दिला जाईल. जे प्रवासी आज प्रवास करणार होते, परंतु आजच्या पावसामुळे त्यांना प्रवास शक्य झाला नाही त्यांना तारखेमध्ये बदल करुन दिले जातील.

- Advertisement -


मुंबईतल्या पावसाची आकडेवारी

मुंबईमध्ये आज सुमारे १८२.३७ मीमी पाऊस पडला. आत्तापर्यंत एकूण १८१३.३१ मीमी पाऊस झाला आहे. डहाणुमध्ये सर्वाधिक ३५४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ठाण्यात १५६ आणि सांताक्रुझमध्ये १२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांत मुंबईत असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. (पावसाची आकडेवारी सौजन्य -स्कायमेट)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -