घरमुंबईसायकल सेवेविरोधात महापालिका

सायकल सेवेविरोधात महापालिका

Subscribe

अहवाल सादर करण्याचा सहाय्यक आयुक्तांचा आदेश

मुंबई महापालिका एकीकडे सायकल ट्रॅक उभारत असताना दुसरीकडे मात्र पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सायकल सेवा सुरू करणाऱ्या संस्थांच्या सायकल पालिकेकडून जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची बातमी दैनिक ‘आपलं महानगरमध्ये’ प्रसिद्ध होताच पालिकेच्या घाटकोपर येथील ‘एन’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश परिरक्षण विभागाला दिले आहेत.

- Advertisement -

सायकल ट्रॅक उभारणार ?

पालिका आयुक्तांनी तानसा पाईपलाईनच्या शेजारी दुतर्फा सायकल ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रविवारी सायकल चालवणाऱ्यांसाठी एनसीपीएपासून वरळी सी-लिंकपर्यंत तात्पुरता सायकल ट्रॅक उभारला जातो. हे सायकल ट्रॅक पर्यावरण रक्षणासाठी उभारत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते. मात्र सामाजिक संस्थेकडून सुरू करण्यात येणाऱ्या सायकल सेवेच्या विरोधात पालिका उभी राहत आहे.

५८ सायकल्स जप्त

- Advertisement -

घाटकोपरमधील भीमाशंकर परिसर विकास प्रतिष्ठान या संघटनेकडून सायकल सेवा सुरू केली जाणार होती. यासाठी सायकल स्टँडची जागा निश्चित करण्यासाठी पालिकेने स्थानिक ट्राफिक पोलिसांचे ‘ना हरकत’ पत्र आणावे असे सांगितले. याची पूर्तता करण्याआधीच पालिकेने सामाजिक उपक्रमाच्या शेडचे कुलूप तोडून ५८ सायकल्स जप्त केल्या आहेत. याबाबतची बातमी प्रसिद्ध होताच ‘एन’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी परिरक्षण विभागातील सहाय्यक अभियंत्यांना याबाबतचा अहवाल त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे लवकरच सायकल सेवा सुरू करण्यासाठी परवानगी मिळेल अशी अपेक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किसान गोपाळे यांनी व्यक्त केली आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -