घरCORONA UPDATEVideo: मुंबई पोलिसांनी सांगितले; पार्टीसाठीच्या आमंत्रणाला भन्नाट उत्तर

Video: मुंबई पोलिसांनी सांगितले; पार्टीसाठीच्या आमंत्रणाला भन्नाट उत्तर

Subscribe

कोरोनाच्या काळात लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हा महत्त्वाचा नियम आहे. परंतू तरीही काही अतिउत्साही तरुण एकमेकांना भेटण्याची कारणं शोधतात. अशावेळी पार्टीसाठी आमंत्रित करणाऱ्यांना काय सांगायचे याचे मजेशीर उत्तर मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी खेल खेल मैं या चित्रपटातील गाण्याची ओळ असलेला व्हिडिओ टाकला असून त्यातून हा संदेश दिला आहे. दुरिया वक्त आने पे मिटाएंगे…, ही ओळ त्यांनी आपल्या ट्विटरवर टाकली आहे. या व्हिडिओला नेटिझन्सनेही चांगला प्रतिसाद दिला असून असे फक्त मुंबई पोलिसांनाच सुचू शकते, अशी प्रतिक्रिया काही युजर्सने दिली आहे.

- Advertisement -

मुंबईत काल १ हजार १२८ कोरोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६७ हजार ६३५ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या ३ हजार ७३५ झाली आहे. तसेच आज ६२८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत मुंबईत ३४ हजार ११९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली.

हेही वाचा –

अजित पवारांसोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह; फडणवीसांचा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -