घरमहाराष्ट्रअजित पवारांसोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह; फडणवीसांचा खुलासा

अजित पवारांसोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीचे शिल्पकार अमित शाह; फडणवीसांचा खुलासा

Subscribe

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सत्ता स्थापनेवरुन मोठं राजकीय नाट्य रंगलं होतं. तब्बल महिनाभर राजकीय घडोमोडी घडत होत्या. पडद्यामागे घडणाऱ्या घटनांचा नेमका अंदाज कोणालाच येत नव्हता. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या सत्ता स्थापनेतील एक घटना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागली आहे. एका मुलाखतीत फडणवीस यांनी त्याविषयीची सल व्यक्त केली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला होता. ऐनवेळी सत्ता वाटपाचं सूत्र न जुळल्यानं सेना-भाजप युती तुटली. त्यानंतरही भाजपनं राष्ट्रवादीला सोबत घेत पहाटे सत्ता स्थापन केली. मात्र, हे सरकार अल्पजीवी ठरलं. सरकार कोसळल्याने दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं. ही घटना फडणवीस यांच्या जिव्हारी लागली. याची सल पत्रकार राजू परुळेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली. पण पहाटेच्या शपथविधी मागे केंद्रीय नेतृत्वाचा हात होता. अमित शाह शपथविधीचे शिल्पकार होते, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

केंद्रातील राजकारणामध्ये फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरु असल्याने अमित शाह नाराज होते का? या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, अमित शाहांमुळे पहाटेचा शपथविधी पार पडला. अमित शाहांना मध्यरात्री फोन करुन मी याबाबत चर्चा केली. त्यांनीच आम्हाला शपथविधी पार पाडा असा इशारा दिला. त्यानंतर आम्ही शपथविधी पार पाडला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -