घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये १२४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह; १४ बाधितांचा मृत्यू

नाशिकमध्ये १२४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह; १४ बाधितांचा मृत्यू

Subscribe

नाशिक जिल्हा प्रशासनास मंगळवारी (दि.२३) दिवसभरात १२४ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात नाशिक शहरात ७८, नाशिक ग्रामीण १६, मालेगाव २८ आणि जिल्ह्याबाहेरील दोनजणांचा समावेश आहे. दिवसभरात १४ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून नाशिक शहरात ८ आणि नाशिक ग्रामीणमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण २ हजार ९९८ रूग्ण करोनाबाधित असून एकट्या नाशिक शहरात १ हजार ३७२ रूग्णांचा समावेश आहे.

नाशिक शहरात करोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी दिवसभरात नाशिक शहरात ७८ नवे रूग्ण आढळून आले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने रूग्णांच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. जिल्ह्यात १ हजार ३० रूग्णांवर उपाचार सुरू आहेत. उर्वरित १ हजार ७१३ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण ३०८, नाशिक शहर ५५८, मालेगाव ७८४ आणि जिल्ह्याबाहेरील ६३ रूग्णांचा समावेश आहे. सध्या ५३९ संशयित रूग्णांचे अहवाल प्रलंबित आहे. यात नाशिक ग्रामीण १४८, नाशिक शहर २३०, मालेगाव १६१ रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात ३१३ संशयित रूग्ण विविध रूग्णालयांमध्ये दाखल झाले. यात जिल्हा रूग्णालय १६, नाशिक महापालिका रूग्णालय १७२, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय २, मालेगाव रूग्णालय १२, नाशिक ग्रामीण रूग्णालय १०७ रूग्ण दाखल झाले आहेत.

- Advertisement -

नाशिक करोना अहवाल
पॉझिटिव्ह रूग्ण-२९९८ (मृत-१८९)
नाशिक ग्रामीण-५८२ (मृत-३२)
नाशिक शहर-१३०६ (मृत-७६)
मालेगाव शहर-९५७ (मृत-७१)
अन्य-८७ (मृत-१०)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -