घरताज्या घडामोडीDiwali vacations : मुंबईतल्या शाळांना अखेर १ ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी...

Diwali vacations : मुंबईतल्या शाळांना अखेर १ ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर  

Subscribe

अन् विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेले दीड वर्षे बंद असलेल्या शाळांची ४ ऑक्टोबरला पुन्हा घंटा वाजली. तरीही कोरोनाचे सावट पुर्णपणे न गेल्यामुळे अनेक निर्बंध पाळून शाळांना सुरुवात झाली आहे. मात्र अवघ्या दहा दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. परंतु मुंबईतील शाळांना अजूनही दिवाळीची सुट्टी जाहीर न झाल्यामुळे मुंबईतील विद्यार्थी आणि पालक संभ्रमात होते. मात्र आता मुंबईतील शाळांना दिवाळीची सुट्टी अखेर जाहीर झाली आहे. शिक्षक निरीक्षकांनी मुंबईतल्या शाळांना अखेर १ ते २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे.

शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी २० ऑक्टोबर रोजी मुंबईचे शिक्षण उपसंचालक तसेच बृहन्मुंबई उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग शिक्षण निरीक्षकांकडे दिवाळी सुट्टी जाहीर करण्याबाबत निवेदन पाठविले होते.आज अखेर यासंदर्भातील आदेश शिक्षण निरीक्षक कार्यालयांनी शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्याने सुट्ट्याबाबतचा शिक्षक,पालक आणि विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे.कोरोना काळात अनेक शिक्षकही कोविड यौध्दा म्हणून कार्यरत होते. त्यामुळे आपल्या मूळ गावी जाऊ शकले नाहीत. सुट्ट्या जाहीर न झाल्यामुळे यावर्षी देखील गावी जायला मिळेल की नाही, याबाबत अनेक शिक्षकही संभ्रमित होते.

- Advertisement -

 


हे ही वाचा – ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी प्रवास १७ टक्क्यांनी महागला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -