घरमहाराष्ट्रनाशिकमालेगावमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक, दहा जण ताब्यात

मालेगावमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक, दहा जण ताब्यात

Subscribe

माथेफिरूंनी हैदोस घालून शहराला धरले. वेठीस

नाशिक । त्रिपुरामध्ये झालेल्या कथित घटनेचे पडसाद शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव बंदमध्ये उमटले. पोलीस प्रशासनाने मालेगावमधील परिस्थिती नियंत्रणात आणली असून शनिवारी मालेगावमध्ये पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवली आहे. आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली असून, कारवाई सुरू आहे, अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. दरम्यान, आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी घटनेमागच्या सूत्रधाराला शोधून काढावे, अशी मागणी केली आहे.

त्रिपुरा घटनेचे पडसाद मालेगावसह राज्यातील काही जिल्हयांमध्ये उमटले. बंदमध्ये काही माथेफिरूंनी अक्षरशः हैदोस घालून शहराला वेठीस धरले. सुमारे पाचशे जणांच्या जमावाने जुना आग्रा रोड, बसस्थानक, किदवाई रोडवर धिंगाणा घालत हॉटेल, दुकाने, घरांवर दगडफेक केली. पोलिसांच्या वाहनांनाही सोडले नाही. अपर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत खांडवी, शहर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी कर्मचार्‍यांसमवेत या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संशयितांनी प्रचंड दगडफेक केली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस नाईक सूर्यवंशी यांच्यावर बेछूट दगडफेक करत प्राणघातक हल्ला केला. या दगडफेकीत तीन पोलीस अधिकारी, सात जवान जखमी झाले. पोलिसांनी अखेर या संशयितांची धरपकड सुरू केली असून, आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -