घरमुंबईसरकारी आकडेवारी सांगतेय, 'मुंबईकर होतायत विसरभोळे'!

सरकारी आकडेवारी सांगतेय, ‘मुंबईकर होतायत विसरभोळे’!

Subscribe

मुंबईकरांचे विस्मरण वाढले असल्याचे समोर आले आहे.

मुंबई शहर हे स्वप्नांचे शहर म्हणून मानले जाते. मात्र, आपली स्वपन पूर्ण करण्यासाठी हे मुंबईकर सतत धावपळ करत असतात. त्यात कामाचा ताण, वरिष्ठांचा दबाव, जेवणाच्या अयोग्य वेळा, अपूर्वी झोप या सर्व कारणांमुळे मुंबईकरांमध्ये विसराळूपणा वाढत असल्याचे समोर आले आहे. हा विसराळूपणा लोकलमध्ये विसरलेल्या वस्तूवरुन समोर आला आहे. लोकलमध्ये तब्बल १ हजार ६८७ प्रवाशांच्या ३ कोटी ६१ लाखांच्या वस्तू पश्चिम रेल्वे सुरक्षा बलाने परत केल्या असून जानेवारी ते ऑक्टोबर, २०१९ या दहा महिन्यांच्या काळातील ही आकडेवारी आहे.

यामुळे विसरल्या जातात वस्तू

अनेकदा प्रवासी लोकलमध्ये चढले की, इतर प्रवाशांना आपल्या वस्तूंचा त्रास नको या उद्देशाने ते आपल्या वस्तू लोकलमध्ये असलेल्या रिकामी रॅकमध्ये ठेवल्या जातात. तर बऱ्याचदा गर्दीतून धक्के खात पुढील स्थानक आपले असल्याचे कळताच त्या प्रवाशांची उतरण्याची घाई होते आणि ते उतरुन जातात. दरम्यान, त्यांची बॅग तशीच राहून जाते, असा वस्तू विसरणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांची सवय असते आणि यातूनच मुंबईकरांचे विस्मरण झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

वस्तू हरवल्याच्या तक्रारी दाखल

‘जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या काळात ८७६ प्रवाशांनी वस्तू हरवल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. यापैकी ८३३ प्रवाशांना त्यांच्या हरवलेल्या वस्तू पुन्हा परत करण्यात आल्या असून उर्वरित ४३ प्रवाशांच्या वस्तू मुख्यालातील गहाळ वस्तू कार्यालयात सांभाळून ठेवल्या आहेत. त्यांचे एकूण मूल्य २ कोटी २२ लाख ७७ हजार ९१० रुपये आहे. २०१८ मध्ये ८११ प्रवाशांनी वस्तू हरवल्याची तक्रार नोंदवली होती. यापैकी ७८० प्रवाशांचा १ कोटी ३८ लाख ७८ हजार ६०२ रुपयांचा मुद्देमाल परत करण्याच आला, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – पगार मिळेपर्यंत पाणी विकून पैसे घ्या; कंत्राटदाराची सूचना

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -