घरCORONA UPDATECoronaEffect: मुंबईचा कचरा झाला ३० टक्क्यांनी कमी

CoronaEffect: मुंबईचा कचरा झाला ३० टक्क्यांनी कमी

Subscribe

मुंबईसह संपूर्ण देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व हॉटेल्स, दुकाने तसेच फेरीवालेही आदींची सेवा बंद आहे. त्यामुळे मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये तब्ब्बल ३० टक्क्यांनी घट झालेली आहे.

मुंबईसह संपूर्ण देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे सर्व हॉटेल्स, दुकाने तसेच फेरीवालेही आदींची सेवा बंद आहे. त्यामुळे मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये तब्ब्बल ३० टक्क्यांनी घट झालेली आहे. मुंबईत दरदिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत सध्या केवळ ३७०० मेट्रीक टन कचरा एवढाच कचरा निर्माण होत आहे.

अनावश्यक सेवा बंदचा परिणाम

सध्या मुंबईत दरदिवशी ६४३० मेट्रीक टन कचरा निर्माण होत आहे. परंतु मागील आठवड्यांपासून मुंबईसह संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यामुळे मुंबईतील जनजीवन ठप्प झाले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता कोणीही रस्त्यावर दिसत नाही. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश दिले आहेत. तर किराणा माल, दुध, औषधाची दुकाने आदी वगळता सर्वच सेवा बंद आहे. सुरुवातीला हॉटेल्स बंद असली तरी ग्राहकांसाठी पार्सल सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. परंतु दुकाने आणि फेरीवाला सेवा तसेच हॉटेल्स सेवा बंद ठेवण्यात आल्यामुळे याचा मोठा परिणाम कचऱ्यावर झाला आहे. केवळ यामुळे दैनंदिन कचऱ्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. या लॉकडाऊननंतर मुंबईत केवळ ३७०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असल्याची माहिती घनकचरा खात्याकडून मिळत आहे.

- Advertisement -

मुंबईतील या कचऱ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्याही फेऱ्या कमी झाल्या आहेत. हॉटेल्स तसेच मार्केटमधील कचरा गोळा करण्यासाठी आधी रात्रीच्या वेळी वाहने उपलब्ध करून देत त्यातून कचरा गोळा केला जात असे. परंतु आता हॉटेल्स सेवा बंद झाल्यामुळे रात्रीच्या सेवा बंद करून दिवसा वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईत सुरुवातील सुमारे ९ हजार मेट्रीक टन एवढा कचरा दैनंदिन कचरा निर्माण व्हायचा. परंतु ऑगस्ट २०१८ मध्ये ओला आणि सुका कचरा वर्गीकरण तसेच खत निर्मिती प्रकल्प आदींचे उपक्रम राबवण्याचे निर्देश देत प्रशासनाने हे प्रमाणे ७२०० मेट्रीक टनवर आणले. परंतु आता हेही कचऱ्याचे प्रमाण आता मुंबई महापालिकेने ६४३० मेट्रीक टनवर आणले आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांमध्ये हे प्रमाण ६०० मेट्रीक टन इतके कमी आणल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

- Advertisement -

यासर्व कचऱ्याची वाहतूक करण्यासाठी सध्या लहान-मोठे असे एकूण ९८७ कॉम्पॅक्टर्स सेवेत आहेत. यामध्ये महापालिकेचे २१३ तर कंत्राटदारांकडील भाडेतत्वावर ७७४ कॉम्पॅक्टर्स आदींचा समावेश आहे.

हेही वाचा –

पंतप्रधानांचा पुण्यातील नायडू हॉस्पिटलच्या नर्सला कॉल, कामगिरीचे केले कौतुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -