घरमुंबई'टोरंट हटाव', कळवा - दिव्यातील नागरिकांचा एल्गार!

‘टोरंट हटाव’, कळवा – दिव्यातील नागरिकांचा एल्गार!

Subscribe

कळवा,दिवा, मुंब्र्यात सरकारने महावितरणचे खाजगीकरण करून विजवसुलीसाठी ‘टोरंट’या खाजगी कंपनीला ठेका देण्यासाठी नियुक्ती केली आहे.परंतु कळवा, मुंब्रा,दिवा ,शीळ,डायघर या परिसरात महावितरणची साठ टक्के पेक्षा जास्त वीज बिलांची वसुली असताना वीज बिल वसुली व वीजपुरवठा करण्यासाठी ‘टोरंट’या खाजगी वीज कंपनीला ठेका देण्यात आला. याचा फटका सर्वसामान्य व स्थानिक नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी ‘टोरोंट हटाव’ चा नारा देत थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

गेल्या सहा महिन्या पासून उभे राहिलेले टोरंट विरोधी आंदोलन पुन्हा एकदा सुरू झाले असून गुरुवारी कळवा दत्तवाडी येथे जमलेल्या मोर्चात शिवसेना,राष्ट्रवादी,मनसे सह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सर्वपक्षीय स्थानिक नागरिक एकवटल्याने मोर्चाला धार आली होती.या मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हड सहभागी होणार होते मात्र ते सहभागी झाले नाहीत. मात्र शीळ डायघर परिसरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक हिरा पाटील,नगरसेवक बाबाजी पाटील व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तर कळवा खरिगावातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक, व शिवसैनिक, मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यामुळे या पुढे या आंदोलनात स्थानिक भूमिपुत्र एकत्र येऊन एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त करीत टोरोंट हटावचा नारा दिला.

- Advertisement -

टोरोंटोच्या प्रारंभाने नवीन मीटर आणि केबलचा प्रत्येकी ग्राहकांना नुकसान ,विद्युत महामंडळ शासनाला ६.९२ पैसे प्रति युनिट देते मग टोरोंटो सोबतच करारात प्रति युनिट ३.७० दार का? शासनाच्या तुटीचा करार का केला? अशा अनेक भेडसावणारे प्रश्न आहेत. विद्युत मंडळाकडे शेकडो पदे रिक्त आहेत. मनुष्यबळ अभावी ग्राहकांना सेवा देता येत नाही. टोरोंटो द्वारे प्रीपेड मीटरला मंजुरी का? थकीत बिले भरण्यासाठी सवलत न देता नोटीस न देता कारवाई गुन्हा दाखल करण्याची मुजोरी करणाऱ्या टोरोंटोला कळवा मुंब्रा परिसरात वीजसेवा देण्यासाठी येण्यापूर्वीच ग्राहकांनी निषेध नोंदवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -