घरमुंबईचारही आरटीआेंच्या कामकाजाचा मागवला लेखाजोखा

चारही आरटीआेंच्या कामकाजाचा मागवला लेखाजोखा

Subscribe

अंधेरी आरटीओत डीडी न भरता प्रवासी वाहनांना परस्पर परवाना दिला जातो, अशा आशयाचे वृत्त मंगळवारी दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकाशित केल्यानंतर मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली.

अंधेरी आरटीओत डीडी न भरता प्रवासी वाहनांना परस्पर परवाना दिला जातो, अशा आशयाचे वृत्त मंगळवारी दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकाशित केल्यानंतर मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली. मुंबईतील चारही आरटीओ कार्यालयांमधील वरिष्ठ अधिकार्‍यांनी संपूर्ण आरटीओच्या कामकाजाचा लेखाजोखा घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी वाहनांची खरेदी केल्यानंतर वाहन पासिंगसाठी आरटीओमध्ये १५ हजार रुपये शुल्क अदा करावे लागते. त्यानंतर वाहन परवाना मिळतो. ही प्रक्रिया थोडी किचकट असल्यामुळे आरटीओमध्ये वाहन चालक आपल्या कामासाठी सरळ दलालांची मदत घेतात.

याचा फायदा घेऊन दलाल अधिकार्‍यांच्या मदतीने नियम धाब्यावर बसवून वाहन परवाना मिळवतात. १५ हजारांचा डीडी भरल्यानंतर परवाना देऊन वाहन पासिंग केले जाते, मात्र आरटीओने डीडीचे पैसे न घेताच अनेक वाहनांना पासिंग आणि परवाने दिले आहेत, अशी माहिती मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली होती. त्यानंतर परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना यासंबंधी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ज्यांनी परवान्याचे पैसे भरले त्यांना आम्ही परवाना दिला आहे. मात्र काही वाहनधारकांनी परवान्यांचे पैसे भरले नाहीत त्यांना परवाना दिलेला नाही. तर अंधेरी आरटीओतील प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी या आरोपात काही तथ्य नसल्याचे सांगितले.

- Advertisement -

आरटीओतील भ्रष्टाचाराचे वृत्त दैनिक ‘आपलं महानगर’मध्ये प्रकाशित होताच मुंबईतील आरटीआेंच्या कामकाजाची माहिती मागविण्यास सुरुवात झाल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. तसेच टॅक्सी आणि रिक्षा चालकसुद्धा आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -