घरमुंबईकोट्यवधींचा भूखंड एमआयडीसीचा, दावा सिडकोचा, ताबा नगरसेवकाचा

कोट्यवधींचा भूखंड एमआयडीसीचा, दावा सिडकोचा, ताबा नगरसेवकाचा

Subscribe

सिडकोकडून फेरीवाल्यांसाठी भूखंड देण्यात आलेला नसतानाही खारघरमधील भाजप नगरसेवक निलेश बाविस्कर यांंच्याकडून मोक्याच्या जागी असलेला कोट्यवधी रुपयांचा भूखंड दुर्गामाता फेरीवाला संस्थेच्या नावाखाली हडप करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजित अडसुळे यांनी केला आहे.

सिडकोकडून फेरीवाल्यांसाठी भूखंड देण्यात आलेला नसतानाही खारघरमधील भाजप नगरसेवक निलेश बाविस्कर यांंच्याकडून मोक्याच्या जागी असलेला कोट्यवधी रुपयांचा भूखंड दुर्गामाता फेरीवाला संस्थेच्या नावाखाली हडप करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अजित अडसुळे यांनी केला आहे. हा भूखंड संस्थेच्या नावाखाली मिळवण्यासाठी बाविस्कर यांनी सिडकोत गेल्या दोन वर्षांपासून कागदोपत्री प्रयत्न सुरू केले.

मात्र, संबंधित भूखंड सिडकोचाच नसल्याची माहिती उघड झाली आहे. हा भूखंड अजूनही एमआयडीसीच्याच ताब्यात असल्याचा दावा एमआयडीसीच्या अधिकार्‍यांचा आहे. त्यामुळे संबंधित भूखंड सिडकोकडून कुणाला कुठल्याही योजनेखाली देण्याबाबत प्रश्नच निर्माण होत नसल्याचा खुलासा एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी केला आहे. एमआयडीसीच्या मालकीचा असलेला हा भूखंड सिडकोच्या घशात घालून त्याचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अडसुळे यांनी केला आहे. खारघर सेक्टर १५ मधील घरकुल आणि स्पगेटी सोसायटीजवळ एमआयडीसीचा भूखंड आहे. या भूखंडाची किंमत आजमितीला २० ते २५ कोटी आहे. या भूखंडावर अतिक्रमण झाल्याने या भूखंडाचा घोटाळा उघडकीस आला आहे. सिडकोकडून या भूखंडाचे भूसंपादन न झाल्याने आजही तो भूखंड एमआयडीसीकडे आहे.

- Advertisement -

दोन वर्षापूर्वी या भूखंडावर भाजप नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी दुर्गामाता फेरीवाला संस्थेच्या नावाखाली मार्केट सुरू केले. हे मार्केट अधिकृत व्हावे म्हणून सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला. सिडकोनेही कोणतीही माहिती न घेता हा भूखंड दुर्गामाता फेरीवाला संस्थेला दिल्याने एकच खळबळ माजली.या प्रकरणाची अडसुळे यांनी चौकशी सुरू केली असता तो भूखंड सिडकोचा नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे दिलेले आरक्षण हे रद्द करण्यात यावे, अशी मागणी अडसुळे यांनी सिडकोकडे केली. तरीही सिडकोकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणी अडसुळे यांनी एमआयडीसीकडे पत्रव्यवहार सुरू केला. यावर संबंधित भूखंड हा आमचाच असल्याचा खुलासा एमआयडीसीकडून करण्यात आला असल्याचे अडसुळे यांनी सांगितले.

खारघरमधील अनेक जमीन घोटाळे बाहेर येत असून त्यातील भाजप नगरसेवकाचा हा एक मोठा घोटाळा आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करत असताना याचा राग मनात धरून दुर्गामाता फेरीवाला संस्थेच्या काही पदाधिकारी व सदस्यांनी भाजी मार्केटची तक्रार का केली असा जाब माझ्या पत्नीला विचारला आणि धमकावले आणि शिवीगाळ केली. बाबतचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज खारघर पोलिसांना दिले आहे. – अजित अडसुळे, सामाजिक कार्यकर्ते

दुर्गामाता फेरीवाला संस्थेला सिडकोने फेरीवाला धोरण अंतर्गत भूखंड दिला असून तसे आम्हाला रितसर पत्र दिले आहे.  तो कोणाचा भूखंड आहे हा आमचा प्रश्न नाही. २००९ च्या फेरीवाला धोरणानुसार हा भूखंड आरक्षित करण्यात आला आहे.  त्याचबरोबर अजित अडसुळे किंवा त्यांच्या पत्नीला धमकी, शिवीगाळही केली नाही.  – निलेश बाविस्कर नगरसेवक, भाजप

दुर्गामाता फेरीवाला संस्थेला आमच्याकडून कोणताही भूखंड देण्यात आलेला नाही. तर ती जागा आमच्याकडे ताब्यात आहे की नाही, याचीही चौकशी करण्यात येत आहे. जर त्या जागेवर अतिक्रमण झालेअसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.   – मोहन निनावे, प्रशासनअधिकारी, सिडको

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -