घरमुंबईनवी मुंबई पोलिसांनी केले अंमली पदार्थ जप्त

नवी मुंबई पोलिसांनी केले अंमली पदार्थ जप्त

Subscribe

पनवेल जवळील मुंबई-पेण जुन्या महामार्गावर पळस्पे फाटा मार्गे अलिबागकडे जाणार्‍या रस्त्यावरील कनका गार्डन हॉटेल, दरबार रेस्टॉरन्टच्या मोकळ्या जागेत काहीजण लाखो रुपये किंमतीचा गांजा आणि चरस विक्रीसाठी घेऊन येण्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या मालमत्ता व अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून चार जणांना गजाआड केले, तर एक जण पळून गेला.

मालमत्ता व अंमली पदार्थ विरोधी कक्ष नवी मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधवंत यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मुरकुळे, महिला पोलीस उपनिरीक्षक राणी काळे, पो.ह.पिरदाजे, संतोष गायकवाड, पो.शि.सांगोलकर व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी चंद्रभागा उर्फ अक्का बाळु भुजबळ (41 रा.वाकड, पुणे), विशाल विद्याधर देशपांडे उर्फ परागशेठ (27), राघव विष्णू शिंदे (27) व अक्षय दादाराम खरपुडे (19) व एक साथीदार या आरोपींनी चरस व गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली. आरोपींकडून पांढर्‍या रंगाची होंडा सिव्हीक गाडीही हस्तगत करण्यात आली आहे.

- Advertisement -

गुटखा हस्तगत
पनवेल । नाकाबंदी दरम्यान ठाणे नाका परिसरात गुटख्याची वाहतूक करणार्‍या एका इसमास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून 4 हजार रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरवडे व त्यांचे पथक ठाणा नाका परिसरात नाकाबंदी करीत असताना प्लेझर गाडीतून एक इसम गुटख्याची वाहतूक करत होता. पोलिसांनी आरोपी पुष्पेन सोहनी (21 रा.करंजाडे) यांना थांबवून त्याच्या ताब्यातील 4 हजार रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासन यांना देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -