घरमुंबईभातुकलीच्या खेळापासूनच मला डॉक्टर व्हायचं होतं! - डॉ. रागिणी पारेख

भातुकलीच्या खेळापासूनच मला डॉक्टर व्हायचं होतं! – डॉ. रागिणी पारेख

Subscribe

लहानपणी भातुकलीच्या खेळातही मला डॉक्टरच व्हायला आवडायचं. मोठं झाल्यावरही डॉक्टर शिवाय दुसरं काहीच व्हायचं नाही याची खूणगाठ मी काहीच कळत नसतानाच बांधली होती. त्यामुळेच मी आज वैद्यकीय क्षेत्रात येऊन थोडंफार कामं करू शकली. त्यात आई-वडील यांचे आशीर्वाद आणि गुरू डॉ. तात्याराव लहाने यांचं मार्गदर्शन यामुळेच माझा आजपर्यंतचा प्रवास करणं मला अधिक शक्य झालं, असं मत सर जे.जे. ची रुग्णालयाच्या नेत्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका डॉ. रागिणी पारेख यांनी बोलून दाखवलं.

कोकण मर्कंटाईल बँक प्रस्तुत माय महानगर आणि आपलं महानगर आयोजित कलामंदिर नवदुर्गोत्सवात दुसर्‍या माळेसाठी त्या सहभागी झाल्या होत्या. देशातील नामवंत नेत्रतज्ञ अशी डॉ. रागिणी पारेख यांची ओळख आहे. सर जे.जे. रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी मिळवून दिली आहे. मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात जन्माला येऊन मराठमोळ्या मुंबईत वाढलेल्या रागिणी पारेख यांनी आतापर्यंत शेकडो शिबिरांमधून राज्यातील गरीब आणि कष्टकरी जनतेला नेत्र उपचार मिळवून दिलेले आहेत. आपल्या यशोगाथेबद्दल सांगताना डॉ. पारेख सांगतात की, लहानपणी जेव्हा मी आजुबाजूच्या मैत्रिणीबरोबर भातुकलीचा खेळ खेळायची तेव्हाही मला त्या खेळात डॉक्टर होणेच पसंत असायचं किंबहुना तेच व्हायला मला आवडायचं. त्यामुळे पुढे शिक्षण घेऊन उच्च शिक्षण घेतल्यानंतर इतर कोणतीही गोष्ट मला आकर्षित करू शकली नाही आणि म्हणूनच आज जे.जे. सारख्या देशात अव्वल असलेल्या संस्थेमध्ये मी काम करू शकली.

- Advertisement -

यासाठी आई-वडिलांचे कष्ट जितके महत्त्वाचे आहेत तितकेच डॉ. तात्याराव लहाने यांनी वेळोवेळी जे गुरुमंत्र दिले त्याचा आयुष्यात यशस्वी होताना खूप मोठा फायदा झालेला आहे. डॉ. रागिणी पारेख यांनी आतापर्यंत राज्याच्या वेगवेगळ्या भागात केलेल्या नेत्र शिबिरांमधील कामाचा सरकारी पातळीपासून ते सामाजिक संस्थांपर्यंत अनेकांनी गौरव केलेला आहे. या गौरवाचे श्रेय त्या विनम्रपणे जे.जे. रुग्णालयाला आणि त्यातल्या कर्मचार्‍यांना देतात. कारण डोळ्यांचा विभाग संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात या संस्थेचे नाव अभिमानाने घेतलं जातं. यामध्ये डॉ. तात्याराव लहाने यांचा खूप मोठा वाटा आहे, असं त्या विनम्रपणे कबूल करतात. त्या पुढे सांगतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या डॉक्टरांना भारतीय डॉक्टरांनी आणि विशेषता जे.जे. सारख्या संस्थेमध्ये शिकवून मोठे झालेल्या डॉक्टरांनी विकसित केलेली आणि आत्मसात केलेली शस्त्रक्रियेची पद्धत ही अचंबित करत असते.

अर्थात त्यामागे हजारो रुग्णांवर उपचार करण्याची संधी मिळाल्यामुळे आलेली सरावातली सफाई कारणीभूत आहे. हे करत असताना रुग्णसेवेचे व्रत हे आपल्यासाठी सर्वस्व असल्याचं त्या नमूद करतात. आमच्या वर्गात डॉ. रागिणी पारेख यांच्याकडून काही त्रुटी राहिल्याचे देखील त्या कबूल करतात त्यांच्याबाबत काढल्या जाणार्‍या तक्रारीच्या सुरात बाबतही रागिणी पारेख यांनी अत्यंत प्रांजळपणे आपली स्पष्टता दिलेली आहे. या मुलाखतीत डॉ. रागिणी पारेख यांच्या रूपाने एक हुशार डॉक्टर जशी आपल्याला परिचित होते. तसेच एक संवेदनशील व्यक्तीही आपल्याला भेटते.

- Advertisement -

ही मुलाखत सविस्तर पाहण्यासाठी आपण www.mymahanagar.com ला भेट द्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -