घरठाणेपक्षनिष्ठेबाबत मला शिकवण्याची गरज नाही!

पक्षनिष्ठेबाबत मला शिकवण्याची गरज नाही!

Subscribe

आव्हाडांनी टीकाकारांचे टोचले कान

ठाणे शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद सुरू आहे. त्यातच गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पक्षनिष्ठेबद्दल मला शिकविण्याची गरज नाही, ठाण्यातील इतिहास मला कोणी सांगू नये. काही लोक त्या काळात नारायण राणे यांच्याकडे गेले होते. त्यांना घेऊन मीच आलो होतो. तेव्हा कोण कुठे होते, कसे होते हे आपल्याला चांगलेच माहिती आहे, असे वक्तव्य करत आव्हाड यांनी पक्षनिष्ठेबद्दल सुरू असलेल्या टीकेचा समाचार घेतला. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रवादी आणि सेनेची आघाडी व्हावी, ही आपली इच्छा असून त्याबद्दल संपर्क प्रमुख म्हणून मीच निर्णय घेणार असल्याचेही स्पष्ट केले.

सोमवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी दिव्यातील एमएमआरडीएच्या घर घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन पुकारले होते. त्या ठिकाणी आव्हाड यांनी रात्री भेट दिली असताना, प्रसारमाध्यमांशी बोलताना, माजी खासदार आनंद परांजपे यांच्यावर पक्षनिष्ठेवरून टीका करणार्‍या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे कान टोचले. एकीकडे राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला यांनी स्बळाची भाषा केली असली तरी त्यांच्याकडून ते वक्तव्य अनावधानाने झाले असल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढे आघाडीबाबत मीच बोलणार आहे. पक्षातील इतर कोणी बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

खारेगाव येथील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या श्रेयवादाच्या लढाईत ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत राजकीय कुरघोडी सुरू झाली. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांच्यात वाक्युद्ध सुरू झाले होते.

पालिकेचा कणा नसलेला आयुक्त – आव्हाड
महापालिकेत आतापर्यंत इतके आयुक्त होऊन गेले; पण त्यात कणा नसलेले हे पहिले आयुक्त असल्याची टीका गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी करत महापालिका आयुक्तांवर केली. एमएमआरडीएच्या घर घोटाळ्यातील त्या अधिकार्‍याला पदावरून बाजूला करून त्याची चौकशी करण्याची जबाबदारी आयुक्तांची आहे. पण, तसे होत नाही म्हणून आयुक्तांविरोधात हे आंदोलन आहे. सत्ताधारी शिवसेनेविरोधात आंदोलन नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

…तर मीसुद्धा रस्त्यावर उतरेन
हा लढा प्रशासनाविरोधात असून तो महापौर किंवा शिवसेनेविरोधात नाही, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. ठामपा आयुक्त डॉ. शर्मा हे दलित आणि मुस्लिमविरोधी आहेत, असा आरोप करून एका पक्षाची बाजू घेऊन महापालिका चालवू शकतो, असे आयुक्तांना वाटत असेल तर मला स्वत:ला रस्त्यावर उतरून आम्ही काय आहोत हे दाखवून द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -