घरमुंबईराष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

Subscribe

लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल - जयंत पाटील

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. काहिदिसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली होती. पंरतु कोरोना नियमांमध्ये शिथिलता दिल्यामुळे नागरिकांच्या बेफिकीरीमुळे कोरोना संकट पुन्हा परतले असल्याचे दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अनेक सभा आणि बैठकांसाठी हजर राहत होते. तसेच दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी शिराळा तालुक्यातील नाटोली येथे आरोग्य उपकेंद्राचा पायाभरणी शुभारंभ केला. यावेळी विकास सोसायटीच्या नुतन इमारतीच्या बांधकामाचेही त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मंत्री जयंत पाटील हे सतत कार्यकर्ते आणि नागरिकांच्या संपर्कात येत होते.

कोरोनाची लागण झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी स्वतः ट्विट करत दिली. मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र तब्येत उत्तम आहे. काळजी करण्यासारखे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे. लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी असी विनंती जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच आभासी पद्धतीने जितके काम करणे शक्य होईल तितके करतो असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यापासून राज्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत आणि मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबईत कोरोनाचे नवे हॉटस्पॉट तयार झाले आहेत. त्यामुळे कोरोना संकट पुन्हा तीव्र होणार का या भितीने सर्वसामान्यांच्या मनात धडकी भरली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -