घरमुंबईकोंबडीची पिसं जलवाहिनीत; केडीएमसी पालिकेचा निष्काळजीपणा!

कोंबडीची पिसं जलवाहिनीत; केडीएमसी पालिकेचा निष्काळजीपणा!

Subscribe

कल्याण-डोंबिवली पालिकेचा बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे

कल्याण-डोंबिवली पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे समोर आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात चक्क नळाच्या पाईपलाईनमध्ये मेलेली कोंबडी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मेलेल्या कोंबडीचे हाडं आणि पिसे पिण्याच्या जलवाहिनीत आढळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

डोंबिवली पूर्वेकडील सूर्यप्रकाशवाडी भागात पांडुरंग केणे चाळ असून या चाळीत समीर पाटील हे या चाळीत राहतात.  गेल्या १० ते १५ दिवसापासून त्यांच्या नळाला अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. याबाबत त्यांनी परिसरातील इतर लोकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो का? अशी विचारणा केली. मात्र पाणीपुरवठा सुरळीत असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यामुळे, समीर यांना त्यांच्या नळाच्या जलवाहिनीमध्ये काही तरी अडकले असल्याची शंका आली. त्यामुळे त्यांनी प्लंबर बोलावून पाईपलाईन चेक केली. यावेळी पाईपलाईन मध्ये त्यांना मेलेल्या कोंबडीचे कातडी, हाडे, पिसे, इतर कचरा आढळून आला. कल्याण-डोंबिवली पालिकेचा बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -