घरटेक-वेकशाओमीने थांबवले या 'दोन' स्मार्टफोनचे उत्पादन

शाओमीने थांबवले या ‘दोन’ स्मार्टफोनचे उत्पादन

Subscribe

सध्या शाओमी कंपनी नवीन स्मार्टफोनला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

भारतीय स्मार्टफोन बाजारात शाओमीच्या कंपनीने चांगलीच पसंती मिळवली आहे. शाओमीच्या स्मार्टफोनकडे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसत आहेत. परंतु शाओमीने त्यांचे नोट सीरीजमधील दोन स्मार्टफोनचे उत्पादन थांबवले आहे. या सिरीजच्या कोणत्याही नवीन मॉडलचे मोबाईल लॉंचिंग होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. सध्या कंपनी नवीन स्मार्टफोनला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शाओमीने आपल्या नोट सीरीजचा पहिला स्मार्टफोन २०१५ मध्ये लॉंच केला होता. त्यामुळे या स्मार्टफोनचे अपडेटेड व्हर्जन येईल अशी शक्यता होती.

शाओमीने ‘एमआय मॅक्स’ आणि ‘एमआय नोट’ या सीरीजच्या स्मार्टफोनची लॉंचिंग होणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. सध्या कंपनी ‘रेडमी एमआय मिक्स’, ‘एमआय ९’ आणि नवीन सीरीज सीसी या स्मार्टफोनसाठी खास प्रयत्न करत आहेत. शाओमी या सीरीजचे फोन मेतू मोबाईलच्या भागिदारीने बाजारात घेऊन येणार आहेत. या सीरीजमधला स्मार्टफोन दिसायला स्टाईलिश आहे. तसेच तरुणांना आकर्षित करणारा स्मार्टफोन ठरणार असेही कंपनीने सांगितले आहेत. ‘सीसी’ सीरिजअंतर्गत ‘एमआय सीसी९’ आणि ‘एमआय सीसी९ इ’ लाँच करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -