घरताज्या घडामोडीरेडिओ क्लबजवळ नवीन प्रवासी टर्मिनल बांधणार

रेडिओ क्लबजवळ नवीन प्रवासी टर्मिनल बांधणार

Subscribe

रेडिओ क्लबजवळ नवीन प्रवासी टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या नव्या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून होणाऱ्या जलवाहतुकीवरील वाढता ताण लक्षात घेता लवकरच येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या रेडिओ क्लबजवळ नवीन प्रवासी टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या नव्या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजूरी दिली असून यासाठी सुमारे १०० कोटींच्या निधींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून लवकरच याचे काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

१०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

मुंबईत जलवाहतुकीला गेल्या काही दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात गेट वे ऑफ इंडिया आणि भाउचा धक्का या बंदरावरुन अलिबाग आणि एलिफंटा येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. गेट ऑफ इंडिया येथून वर्षाला २६ लाखांपेक्षा जास्त पर्यटक जलवाहतुकीला प्राधान्य देत असतात. त्यामुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण वाढत चालला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल आता राज्य सरकारने घेतली असून त्यासाठी रेडिओ क्लबजवळ नवीन प्रवासी टर्मिनल सुरु करण्याची चाचपणी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रकल्पाला नुकताच हिरवा कंदील दर्शविण्यात आला असून येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पुर्ण केला जाणार आहे. साधारणपणे याठिकाणी अलिबाग आणि एलिफंटा यासाठी वाहतुक चालविली जाणार आहे. या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली असून लवकरच या प्रकल्पाच्या निविदा काढण्यात येतील अशी माहिती मत्स्यसंवर्धन आणि बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली. या प्रकल्पाला वित्त विभागाकडून मान्यता मिळाली आहे.

- Advertisement -

एकाचवेळी १ हजार प्रवासी क्षमता असलेले हे टर्मिनल

अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार रेडिओ कल्बच्या २०० मीटरच्या आसपास ही जेट्टी बांधण्यात येणार आहे. एकाचवेळी १ हजार प्रवासी क्षमता असलेले हे टर्मिनल असणार आहे. याठिकाणी ५ हजार ५० चौरस फुटांचे प्रतिक्षालय देखील असणार आहे. तर नव्या जेट्टी आणि टर्मिनलमध्ये नवीन टर्मिनल इमारतीत पार्किंगही असेल. या जेट्टीमध्ये एकूण आठ धक्के असतील नौका मालकांसाठी एक धक्का राखीव असणार आहे. तर या प्रकल्पासाठी भारतीय नौदल, तटरक्षकदल, पुरातत्व विभाग – मुंबई, मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण या सर्व संस्थांच्या परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच या नव्या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती यानिमित्ताने पुढे येणार आहे.


हेही वाचा – लोकलच्या गर्दीचा आणखी एक बळी; दोन जण गंभीर जखमी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -