घरमुंबईसायबर गुन्हेगारीचा नवा फंडा

सायबर गुन्हेगारीचा नवा फंडा

Subscribe

शॉपिंगच्या नावाखाली तिघांची लूट

सायबर गुन्हेगारीचे पोलिसांसमोर आव्हान असून दिवसेंदिवस त्यात वाढ होताना दिसत आहे. मात्र सायबर गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत. सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात केवळ गरीब मध्यमवर्गीयच फसत नसून सुशिक्षितदेखील शिकार होत आहेत. शिक्षक, डॉक्टर,वकील, पोलीस हे देखील सायबर गुन्हेगारीला बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. एका सोशल साईटवरुन वेगवेगळी कारणे देत तिघांना लुटल्याीची माहिती समोर आली असून पोलीस या प्रकरणांचा तपास करत आहेत.

बदलापूर येथे राहणार्‍या डॉक्टर ज्योत्स्ना सावंत या वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयात मेडिसिन विभागात नोकरी करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी ऑनलाइन शॉपिंग वरून घड्याळ आणि शोभेचा गळ्यातील हार विकत घेतला होता. खरेदीच्या काही आठवड्यानंतर त्यांना ज्या ऑनलाइन कंपनीतून खरेदी केली, तेथून तुम्ही लकी ड्रॉ जिकल्याचा मेसेज आला, त्याच बरोबर एक मोबाईल नंबर पण आला होता. डॉक्टर ज्योत्स्ना यांनी त्या मोबाईल क्रमांकावर फोन करून चौकशी केली, तेव्हा त्यांना टाटा सफारी ही मोटार लकी ड्रॉमध्ये जिंकल्याचे सांगण्यात आले, तसेच टाटा सफारी गाडी नको असल्यास गाडीची किंमत तुमच्या खात्यात टाकण्यात येईल असे सांगून धनादेश ट्रान्सफर चार्ज म्हणून त्या समोरच्या व्यक्तीने डॉक्टर ज्योत्स्ना याना एका बँकेचा खाते क्रमांक देऊन तुम्ही त्यात ७५००रुपये भरण्यास सांगितले. मोठी रक्कम मिळणार या हव्यासापोटी ज्योत्स्ना यांनी बँक खात्यात पैसे भरले, मात्र समोरच्या व्यक्तीने त्यांच्याकडे रक्कम मिळवण्यासाठी वेळोवेळी पैसे भरण्यास सांगून डॉक्टर ज्योत्स्ना यांच्याकडून सव्वादोन लाख रुपये उकळले, अजूनही तो पैसे उकळण्याचा प्रयत्नात होता, मात्र ज्योत्स्ना यांच्या आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी भरलेली रक्कम परत मागितली. मात्र त्यानंतर समोरच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक कायमचा बंद झाला.अखेर डॉक्टर ज्योत्स्ना यांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

दरम्यान, मयूर कदम या विद्यार्थ्याची याच प्रकारे फसवणूक झाली आहे. मयूर हा एका पोलीस अधिकार्‍याचा मुलगा असून शिक्षण घेत आहे. वरळीत राहणार्‍या मयूरला फेसबुक खात्यावर वैयक्तिक कर्ज देत असल्याची माहिती मिळाली. मयूरला स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी तसेच लंडनला जाण्यासाठी कर्ज हवे होते. दरम्यान, मयूरने आलेल्या मेल आयडीवर कर्जासाठी अर्ज केला. त्यानंतर कर्ज मिळवण्यासाठी मयूरकडून वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली पैसे उकळण्यात आले. मयूर वडिलांकडून पैसे घेऊन संबधित खात्यावर पैसे जमा करीत राहिला. सुमारे साडे सहा लाख भरूनही समोरची व्यक्ती कर्ज देण्यास टाळाटाळ करू लागली. अखेर आपली फसवणूक होत असल्याचे कळताच मयूरने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर फसवणुकीचे असे प्रकार वाढले असून हे सायबर गुन्हेगार आपले सावज शोधण्यासाठी वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्स धुंडाळत असतात.

दरम्यान, कुर्ला परिसरात राहणार्‍या काजल शेनीत जैन यांचीदेखील अशाचप्रकारे फसवणूक झाली असून त्यांनी क्लब फॅक्टरी नावाच्या सोशल साईटवरुन कपडे खरेदी केल्याने त्यांना हा फटका बसला आहे. काजल यांनी त्यांच्याकरता ड्रेस खरेदी केला होता. मात्र तो न मिळाल्याने त्यांना पैसे परत हवे असल्यास बँक खात्याची माहिती एका लिंकवर जाऊन भरण्यास सांगितले. मात्र केवळ २४३ रुपयांसाठी त्यांनी ४ हजार ९९९ रुपये गमावले. क्लब फॅक्टरीच्या नावाने गुगल साईटवर असणार्‍या माबाईल नंबरवरुन ही फसवणूक होत असूनअनेकजणांना लुटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -