घरमुंबईविना पासपोर्ट बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन, युगांडा नागरिकांना अटक 

विना पासपोर्ट बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन, युगांडा नागरिकांना अटक 

Subscribe

भारतात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट व राहण्यासाठीचा विजा नसताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन व युगांडा देशातील नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अटक केली. यामध्ये ६ नायजेरियन देशातील नागरिक व ३ युगांडा देशातील महिलांचा समावेश आहे.  दरम्यान, बेकायदेशीर झोपडपट्टी, दुकाने व बिना पासपोर्ट राहणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाईची मोहीम कायम सुरूच राहणार असल्याची माहिती खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील नवी मुंबई, पनवेल , उरण परिसरात विदेशी नागरिकांचा वावर वाढताना दिसत आहे. यामध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून सदर बाब नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य आणि अखंड देशाची सुरक्षा धोक्यात आणणारी आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी अशा प्रकारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नागरिकांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले आहे. याद्वारे बेकायदा विदेशी नागरिकांचा शोध सुरु केला आहे.

- Advertisement -

खारघर परिसरात नायजेरियन नागरिकांचा उपद्रव वाढला असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. याबाबत तात्काळ गंभीरपणे दखल घेऊन नवी पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त परिमंडळ २ पनवेल शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी ५ डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता खारघर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस आयुक्त गिड्ड, पनवेल विभाग व सहाय्यक पोलीस आयुक्त चव्हाण यांच्या उपस्थितीत गुन्हे शाखा, पनवेल विभाग व पासपोर्ट विभाग तसेच खारघर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार असे एकूण २ सहाय्यक पोलीस आयुक्त, ६ पोलीस निरीक्षक, १४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व ६० पोलीस अमलदार, १ आर एस पी पथक, झोन २ स्ट्रायकिंग असा बंदोबस्त  घेऊन कोम्बिंग ऑपरेशनसाठी खारघर पोलीस ठाणे येथे जमा होऊन येथून पहाटे साडेचार वाजता रवाना झाले. खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेषतः बेकायदेशीर नायजेरियन नागरिक राहत असलेल्या परिसरातील स्काय व्हॅली बिल्डिंग, मॅजेस्टिक रेसिडेन्सी, आलन रेसिडेन्सी या खारघर सेक्टर ३४ मधील बिल्डिंग चारी बाजूने पोलीस बंदोबस्त लावून सदर ठिकाणी राहत असलेल्या नायजेरियन नागरिक यांचा शोध घेतला. या शोध कोम्बिंग ऑपरेशन ६  नायजेरियन नागरिक व ३  युगांडा महिला आढळून आल्या, त्यांना ताब्यात घेऊन विदेशी नागरिकांकडे भारतात प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट व राहण्यासाठीचा विजा याबाबत पासपोर्ट विभागाचे अधिकारी व अमलदार त्याने चौकशी केले असता त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्यासाठी व राहण्यासाठी कोणतीही कायदेशीर कागदपत्र नसल्याचे खात्री झाली. त्यामुळे सदर नायजेरियन व युगांडा विदेशी नागरिक यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६  चे कलम १४ ( अ) सह पारपत्र अधिनियम १९६७  चे कलम १२ (१ ) (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -