घरमुंबईNikhil Wagle : पुण्यात भाजपाकडून लोकशाहीचा खून करण्याचा निर्लज्ज प्रयत्न; राऊतांची सडकून...

Nikhil Wagle : पुण्यात भाजपाकडून लोकशाहीचा खून करण्याचा निर्लज्ज प्रयत्न; राऊतांची सडकून टीका

Subscribe

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच निखिल वागळे हे आज ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमानिमित्त पुण्यात आहेत. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी संध्याकाळच्या वेळेला निर्भया बनो कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीवर शाहीफेक करत हल्ला करण्यात आला. यानंतर आता महाविकास आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ठाकरे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करताना आरोप केला की, पुण्यात भाजपकडून लोकशाहीचा खून करण्याचा निर्लज्ज प्रयत्न झाला आहे. (Nikhil Wagle Shameless attempt to kill democracy by BJP in Pune Sanjay Rauts sharp criticism)

हेही वाचा – Nitish Sarkar: Floor Test आधीच नितीश कुमार सरकारसमोर मोठा पेच; कोण बसणार अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर?

- Advertisement -

संजय राऊत यांनी ट्वीट करताना म्हटले की, अनेक महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांना भाजपाच्या गुंडांनी मारहाण केली, त्यांच्यावर अंडी, दगड, विटा फेकल्या, मात्र पुणे पोलीस प्रेक्षक बनून राहिले. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची गाडी फोडली. त्यांच्या गाडीवरही शाई, अंडी फेकली. खरं तर पुण्यात भाजपाकडून लोकशाहीचा खून करण्याचा निर्लज्ज प्रयत्न सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी खचून जाणार नाही. लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या अनाथ मुलींना इजा करण्याचा आदेश देत आहात. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

हेही वाचा – Devendra Fadnavis : निखिल वागळे कितीही चुकीचे बोलले तरी…; पुणे हल्लाप्रकरणी फडणवीसांचे भाष्य

- Advertisement -

तुमच्या राजवटीत महाराष्ट्रीयन कुत्र्याचे जीवन जगत आहे 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना वक्तव्य केलं होतं की, विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे की, गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील. फडणवीसांच्या या टीकेवरही संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, कुत्रा पळवला तरी विरोधक राजीनाम्याची मागणी करतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीस विसरू नका, तुमच्या राजवटीत महाराष्ट्रीयन कुत्र्याचे जीवन जगत आहेत. शिंदे-फडणवीस सरकार मुंबईत भुंकते आणि दिल्ली मास्टर्सपुढे शेपूट हलवते. भुंकत राहा आणि वाजवत राहा, तुमच्याकडून आणखी काय अपेक्षा करू? तुम्ही महाराष्ट्राची शांतता पूर्णपणे भंग केली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -