घरठाणेभाजपा-शिवसेनेतील वाद विकोपाला जाण्याची भीती

भाजपा-शिवसेनेतील वाद विकोपाला जाण्याची भीती

Subscribe

...तर युतीला मदत करणार नाही-भाजपाची स्पष्टोक्ती

हिल लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार करून शिवसेना प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांचा वचपा काढण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांना पोलीस टार्गेट करीत असतील तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला भाजपा मदत करणार नाही, असा इशारा भाजपा मंडळ अध्यक्षांच्या बैठकीत देण्यात आला आहे. दरम्यान भाजपाचे भावेश टोळ यांच्यासमवेत दोन जणांना क्राईम ब्रांच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने भाजपात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी भाजपाच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या मंडळ अध्यक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गाव चलो अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहचवण्याबाबत चर्चा करण्यात आली. परंतु या योजनेबद्दल मोहिम राबवताना भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस आणि शिवसेनेचेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांचे मनोबल खचत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. गोळीबारच्या घटनेनंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे.

भाजपा कार्यकर्त्यांना कारण नसताना पोलीस त्रास देतात, या मुळे भाजपा कार्यकर्ते बाहेर पडत नसल्याने भाजपाच्या गाव चलो अभियांनाला खिळ बसली असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला. शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेले वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन समेट घडवून आणला पाहिजे, तसे झाले नाही हा वाद विकोपा ला जाईल. परिणाम स्वरूप आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा कार्यकर्ते युतीच्या उमेदवारांसाठी काम करणार नाहीत. असा इशारा मंडळ अध्यक्षाच्या बैठकीत देण्यात आला.

- Advertisement -

आमदार गायकवाड यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान 14 फेब्रुवारीपर्यंत आमदार गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तो पर्यंत भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍यांनी गोळीबार प्रकरणात वक्तव्ये करू नयेत, शिवाय खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कोणीही अपशब्द वापरून दोन्ही पक्षात वाद निर्माण होईल अशी वर्तवणूक करू नये. अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठांनी दिल्या. मात्र गोळीबार प्रकरणात कार्यकर्त्यांना नाहक अडकवण्याचा प्रयत्न केल्यास भाजपा गप्प बसणार नाही. त्याचा वचपा निवडणुकीत काढू, असा इशाराही बैठकीत देण्यात आल्याने आगामी लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजपात ताळमेळ राहील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -