घरदेश-विदेशNIRF Report- 2023 : मुंबई आयआयटीने मारली बाजी; इंजिनिअरिंगमध्ये तिसरा तर रिसर्चमध्ये...

NIRF Report- 2023 : मुंबई आयआयटीने मारली बाजी; इंजिनिअरिंगमध्ये तिसरा तर रिसर्चमध्ये चौथा क्रमांक

Subscribe

 

नवी दिल्लीः National Institute of Ranking Framework 2023 चा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात मुंबई आयआयटीने (IIT Bombay) बाजी मारली आहे. इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांच्या यादीत तिसरा क्रमांक, तर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई आयआयटीने चौथा क्रंमाक पटकावला आहे.

- Advertisement -

देशातील दंत महाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्याचे डी.वाय. पाटील विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातील टॉप १० विद्यापीठांमध्ये महाराष्ट्रातील एकही विद्यापीठ नाही. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे १९ व्या स्थानकावर आहे. सिम्बायोसिस हे ३२ व्या क्रमांकावर आहे. मुंबईतील इन्सिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) २३ व्या क्रमांकावर आहे.

 

- Advertisement -
विद्यापीठ स्कोअर  क्रमांक
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे   58.19 19
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी  57.07 23
सिम्बायोसिस इंटरनॅशनल  (पुणे,) 53.13 32
दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अॅन्ड रिसर्च  51.92 39
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे 50.62 46
नरसी मोनजी  इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, मुंबई 50.31  47
मुंबई विद्यापीठ, मुंबई  48.63  56
भारती विद्यापीठ, पुणे  43.61 91
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई 43.08 98

महाविद्यालये 

 

फर्ग्युसन (स्वायत्त) महाविद्यालय पुणे 53.88 79
शासकीय विज्ञान संस्था नागपूर 53.54 83
निर्मला निकेतन सामाजिक कार्य महाविद्यालय 55.18 57

व्यवस्थापनशास्त्र

राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी इन्स्टिट्यूट, मुंबई 71.997 7
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे 68.11 10
सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट 62.74 20
एसवीकेएम नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज  60.84  21
 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 53.41 43
 के. जे. सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅन्ड रिसर्च 52. 14 45
एल एन वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅन्ड रिसर्च 48.21 73
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट 47.08 76

 संशोधन संस्था 

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च   मुंबई 62.66 10
होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट    मुंबई  58.88 15
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिचर्स, पुणे  52.22  27
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई 48.82 37

IIT प्रवेशासाठी 75 टक्के गुण आवश्यकच

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मध्ये प्रवेश घेण्यासाठी उच्च माध्यमिक परीक्षेत 75 टक्के गुणांचे पात्रता निकष शिथिल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मे २०२३ रोजी फेटाळून लावली. याबाबत सुनावणी करताना प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की, आता या टप्प्यावर ते हस्तक्षेप करू शकत नाही, त्यामुळे यावर सरकारी अधिकाऱ्यांनी विचार करून निर्णय घ्यायचा आहे. या टप्प्यावर प्रवेश प्रक्रियेच्या चालू असलेल्या प्रक्रियेत आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. सरकारने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा विचार या आधीच करणे आवश्यक होते. त्यामुळे या वर्षी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (JEE) प्रगत माहितीपत्रकानुसार, उमेदवारांनी इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेत किमान 75 टक्के गुण मिळवणे महत्त्वाचे असणार आहे. या प्रकरणातील याचिकाकर्त्या अनुभा सहाय यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत म्हटले आहे की, 75 टक्के पात्रता निकष गेल्या वर्षीपर्यंत लागू नव्हते. पात्रता निकषातील या अचानक करण्यात आलेल्या बदलामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो, असे निवेदन सादर करण्यात आले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -