घरमुंबईमृतदेहापासून कोरोना संसर्गाचा धोका नाही- मुंबई महापालिकेचा दावा

मृतदेहापासून कोरोना संसर्गाचा धोका नाही- मुंबई महापालिकेचा दावा

Subscribe

कोरोनाने बळी गेलेल्या मृतदेहाचे अंत्यविधी करताना पुरेशी काळजी घेतो आणि नियमांचे पालन करतो, असे सांगत महापालिकेने मृतदेहापासून संसर्ग झाल्याचा पुरावा नाही, असाही दावा केला

मुंबई महापालिकेच्या वतीने कोरोना व्हायरस संदर्भात अजब दावा कोर्टात करण्यात आला आहे. कोरोना संक्रमित मृतदेहापासून इतरांना Covid-19 चा संसर्ग होत नाही, असा दावा मंगळवारी एका याचिकेसंदर्भात उत्तर देताना मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयात केला आहे.

तसेच वांद्रे येथील बडा कब्रस्तानमध्ये कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर दफनविधीस विरोध करणाऱ्या याचिकेवर पालिकेने उत्तर दाखल केले आहे. कोरोनाबाधितांच्या मृतदेहाचा दफनविधी केल्यास त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, अशी भीती याचिकेत व्यक्त करण्यात आली होती. तसेच यासंदर्भातील पालिकेच्या परिपत्रकाला आव्हान देण्यात आले होते. कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्यांचे मृतदेह पुरेशी काळजी न घेता पुरले गेल्यास बाजूच्या वस्तीत कोरोनाचा फैलाव होण्याचा दावा आहे. बांद्रा कब्रस्तानच्या जवळ रहिवासी क्षेत्र असल्याने चिंता व्यक्त करत ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

- Advertisement -
मृतदेहापासून संसर्ग होत असल्याचा पुरावा नाही

दरम्यान, जगभरात मृतदेहापासून कोरोनाचा फैलाव होत असल्याची शंका असल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाच्या अंत्यविधीबाबत नियमावलींचे पालन केले जात आहे. कोरोनाने बळी गेलेल्या मृतदेहाचे अंत्यविधी करताना पुरेशी काळजी घेतो आणि नियमांचे पालन करतो, असे सांगत असतानाच मुंबई महापालिकेने मृतदेहापासून संसर्ग झाल्याचा कुठलाही पुरावा नाही, असाही दावा केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आयुक्तांनी कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी काय सोपस्कार असतील याची नियमावली जारी केली होती. मात्र पालिकेच्या मते, मृतदेहापासून धोका नाही, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान आतापर्यंत कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहापासून संसर्ग झाल्याची कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे.


ठाणे महापालिकेत १५०० कंत्राटी पदांची मेगाभरती, थेट मुलाखती होणार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -