घरमुंबईयाद्याच तयार नसताना क्लस्टरबाबत मागवल्या हरकती

याद्याच तयार नसताना क्लस्टरबाबत मागवल्या हरकती

Subscribe

ठामपाचा ढिसाळ कारभार

ठामपाने क्लस्टर संदर्भात भोगवटाधारकांची प्राथमिक यादी कोपरी-नौपाडा प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती, लोकमान्य-सावरकर प्रभाग समितीमधील क्लस्टर कक्ष व महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत असल्याचे आणि यासंदर्भात कुणाची काही हरकत, सूचना असल्यास नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात देण्यात याव्यात, असे सांगण्यात आले आहे. मात्र, अद्याप याची यादीच ठामपाकडे तयार नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

ज्या मालमत्तांना मालमत्ता कराची आकारणी झाली नसेल तर क्लस्टरमध्ये येण्यापूर्वी त्या मालमत्तांची कर आकारणी करून घेण्याची जबाबदारी संबंधिताची असेल. मात्र, कर आकारण्यापूर्वी सहाय्यक आयुक्तांनी त्या मालमत्तांची पात्रता तपासून त्यानंतरच कर आकारणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. ठामपाच्यावतीने ज्या 6 नागरी विकास पुनरुत्थान आराखड्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्या प्रत्येक आराखड्यांसाठी सहा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आदेश देतानाच क्लस्टरसाठी जे विविध कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. त्या कक्षांच्या प्रमुखांनी क्लस्टर अंतर्गत ज्या मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्या मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्या सुविधा देण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. क्लस्टर योजनेमध्ये रंगसंगती, स्ट्रीट फर्निचर, सौंदर्यीकरण आदीबाबत स्पर्धेच्या माध्यमातून संकल्पचित्रे मागविण्यात येणार असून, त्याची अंमलबजावणी क्लस्टर योजनेमध्ये करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेला लागणारा वेळ पाहता सद्यस्थितीत निवडणुकीच्या कालावधीत हे शक्य नाही. तरीही ठामपाच्यावतीने जाहिरात प्रसिद्ध करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला आहे.

- Advertisement -

भोगवटाधारकांची यादी तयार नसतानाही वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती कशा देण्यात आल्या. सध्या निवडणुकीचा काळ सुरू आहे. ठामपातील 80 टक्के कर्मचारी निवडणूक कामात व्यग्र आहेत. अशा वेळी नागरिकांनी हरकत नोंदविल्यास त्यावर कार्यवाही कोण घेणार? सामान्य ठाणेकरांची दिशाभूल करणारी ही जाहिरात कुणाच्या सांगण्यावरून प्रसिद्धीस देण्यात आली. ही बाब लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता भंग नाही का? निवडणुकीचा जुमला करण्यासाठीच हा खटाटोप करण्यात येत आहे. क्लस्टरच्या श्रेयासाठी पुढे असणार्‍या बॅनरबाज सत्ताधार्‍यांनी याबाबतचे सत्य ठाणेकरांना सांगावे, अशी माझी विनंती आहे.
संजय घाडीगावकर, उपाध्यक्ष, ठाणे विभागीय भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -